Maval Patan Village Landslide Father Mother and Son Died of Same Family; मुलाचं एका वर्षापूर्वी लग्न, बायको गरोदर म्हणून गावी, घरावर दरड कोसळ्याने लेकासह आई-वडिलांचा करुण अंत; मावळमध्ये हळहळ
Maval Patan Village Landslide Father Mother and Son Died of Same Family; मुलाचं एका वर्षापूर्वी लग्न, बायको गरोदर म्हणून गावी, घरावर दरड कोसळ्याने लेकासह आई-वडिलांचा करुण अंत; मावळमध्ये हळहळ
Maval Patan landslide One Family Three People Death : मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. डोंगरकड्याचा मोठा भाग निसटून गावावरील घरांवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
मावळ घरावर दरड कोसळली आई वडील मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २२ ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघांचा मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. विविध घटनांमध्ये २० नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. ३० जणांची सुरक्षित सुटका केली असून, पाचशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
‘जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून, मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आळंदी येथे अडकलेले २० पोलिस कर्मचारी आणि ४०० भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. जिल्ह्यातील नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असून, औंध येथील ३० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील २५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसर व लोणावळा- कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविणे सुरू आहे. हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले,’ अशी माहिती डुडी यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा