Maoists active in gadchiroli 16 teams conducting combating operations high alert in 3 states; सीमेवर माओवादी सक्रिय; तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी, १६ पथकांकडून कोम्बिंग ऑपरेशन
Maoists active in gadchiroli 16 teams conducting combating operations high alert in 3 states; सीमेवर माओवादी सक्रिय; तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी, १६ पथकांकडून कोम्बिंग ऑपरेशन
महेश तिवारी, गडचिरोली: सरकारने माओवादमुक्तीची घोषणा केली असली, तरी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणच्या सीमावर्ती भागांत अजूनही काही माओवादी आणि जनमिलिशिया सदस्य सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज, मंगळवारपासून माओवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी केला आहे.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड व तेलंगण सीमेवरील २५हून अधिक पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सी-६० कमांडोची १६ पथके अतिसंवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. उच्च क्षमतेच्या ड्रोनद्वारे जंगल परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगण पोलिसांमध्ये माहितीची देवाण-घेवाण; तसेच संयुक्त शोधमोहीम सुरू राहणार आहे. पुढील आठ दिवस सीमावर्ती भागातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
चारू मजूमदारसह पोलिसांच्या कारवाईत ठार झालेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत माओवादी शहीद सप्ताह पाळतात. बंदची हाक देतात. हिंसक कारवाया, रास्ता रोको, जाळपोळ, सरकारी व खासगी मालमत्तेची नासधूस, राजकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करत असतात. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माओवादमुक्तीच्या घोषणेनंतर हा पहिलाच शहीद सप्ताह आहे. अलीकडेच भामरागड तालुक्यात बंदचे आवाहन करणारे बॅनर आणि पत्रके आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सीमावर्ती भागांत काही सशस्त्र केडर व माओवादी विचारसरणीशी संबंधित जनमिलिशिया सदस्य अजून सक्रिय असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे.
दरम्यान, “शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सतर्क आहोत. सीमेवर विशेष दक्षता घेतली जात आहे. कुठल्याही माओवादी समर्थकांच्या किंवा त्यांच्या विचारधारेला मानणाऱ्यांच्या कारवाया पूर्णपणे रोखण्यासाठी गडचिरोली पोलिस सक्षम आहेत,” असं विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा