Headlines

Mandar Cholkar : ‘चार महिने झाले निर्मात्याने पैसे बुडवलेत’, चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक, सांगितला प्रसंग


Chetana Bhat Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक झाली असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं सांगितलं आहे.

Chetana Bhat Husband Mandar Cholkar Defrauded By Producer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मालिका किंवा सिनेमांमध्ये काम करूनही मानधन न मिळाल्याचा अनुभव काही कलाकारांना आला आहे. याबद्दल काही कलाकारांनी उघडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटचा नवरा आणि गीतकार मंदार चोळकरची फसवणूक झाली असून त्यानं याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

मंदार चोळकरची पोस्ट

मंदार चोळकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘आमच्या फिल्म इंडस्ट्रीत ( किंवा.. एकूणच दुनियेत ) फसवणारे लोक भेटतातच. वेळेत पैसे नं देणं, उशिरा देणं, कमी देणं… ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. एक निर्माता आज देतो उद्या देतो अशी पैसे द्यायला टाळा टाळ करतोय. आम्ही ह्या क्षेत्रात उतरलोय ते व्यवसाय किंवा धंदा म्हणून. धंदा म्हटलं की, चढ-उतार आलेच. म्हणूनच मी माझ्या औकातीवर ‘उतरून’ ‘चढायचं’ ठरवलं आहें.
Maharashtra TimesAjinkya Deo : ‘रामायण’मध्ये अरुण गोविल नाही तर ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार होता राजा दशरथाची भूमिका, स्वतःच केला खुलासा

निर्मात्यानं थकवले पैसे

‘तर विषय असा आहे, एका खिशात स्वतःचे पैसे नसणाऱ्या निर्मात्याकडून आलेल्या एका सिंगल गाण्यासाठी मी शब्द दिले आणि माझ्या शब्दाखातर माझ्या ओळखीतल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम गायकाने ते मानधन नं विचारता गायलं ही. त्या गायकाचे, माझे आणि माझ्या संगीतकारचे 4 महिने झाले पैसे अडकले आहेत. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या क्षेत्रात पैसे बुडावणं हे रुटीन झालंय, पण माझा त्रास वेगळंच आहे. त्या निर्मात्याने आमचे पैसे बुडवले आहेतच. पण आता त्या गायकाला मला दुसऱ्या गाण्यासाठी भेटायचं आहे. ते कुठल्या तोंडाने भेटू? तो किंवा त्याचा मॅनेजर आधीच्या गाण्याचे पैसे मागणार ही नाहीत कदाचित… पण माझे संस्कार माझ्या आड येत आहेत. कारण पहिले पैसे क्लिअर व्हायलाच हवेत.’ असं मंदारनं शेवटी म्हटलं आहे.

दरम्यान, मंदारच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘दुनियादारी’ सिनेमातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, तसेच ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातील ‘मनमंदिरा’ हे नाट्यगीत यांसारख्या अनेक गाजलेल्या गाण्याचं लेखन त्यानं केलं आहे.