जायखेडा परिसरातील कांदा व मका उत्पादकांची काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पूर्वी सहायक पोलिस निरीक्षक काळे यांच्याकडे होता. न्यायालयाने एका संशयित व्यापाऱ्याचा जामीन मंजूर केला असून, अन्य व्यापाऱ्यांना अटक झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन केले होते. यावेळी जायखेडा पोलिसांनी तपासात कुचराई केली, तसेच आरोपींना जामीन व्हावा यासाठी सबळ पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत, असे आरोप करण्यात आले.
Nashik Rain: नाशिकमध्ये कोसळधारेने दाणादाण! जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, कळवण-सुरगाण्यासाठी आज ‘रेड अलर्ट’
शेतकऱ्यांनी काळे यांच्या निलंबनाची मागणी केली, तसेच जामीन झालेल्या व्यापाऱ्याला पुन्हा अटक होईल, यासाठी न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यात यावेत, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, शेतकऱ्यांनी सादर केलेल्या पावत्या व इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करावेत, अशा मागण्या केल्या. या आंदोलनात शेतकरी विवेक नंदन, मयूर नेरकर, प्रकाश खैरनार, कुलदीप देवरे, कैलास ठाकरे, भास्कर गांगुर्डे, युवराज जाधव, मोहन भामरे, योगेश गवळी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप; रस्ते खचले, वाहने अडकली, नद्यांना पूर
आश्वासनानंतर आंदोलन मागे
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक गुंजाळ व तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक राकेश मानगावकर यांनी संशयित आरोपींना आठ दिवसांत अटक केली जाईल, न्यायालयात सबळ पुरावे सादर केले जातील, असे आश्वासन दिले. आंदोलनकर्ते काळे यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम होते .दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक गुंजाळ यांनी जिल्हा पोलिस प्रमुख स्वामी यांच्याशी चर्चा केली. या त्यानंतर गुंजाळ यांनी काळे यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केल्याचे आंदोलकांना सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

