Headlines

Maharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष


Viraj Jagtap Struggle : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विराज जगतापनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

Viraj Jagtap Struggle Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. हास्यजत्रेमुळे अनेक कलाकारांचं नशीब पालटलं आहे. त्यापैकी एक म्हणजेच अभिनेता विराज जगताप . विराज जगताप अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये काम करतोय. या कार्यक्रमामुळे विराज घराघरात पोहोचला. मात्र, अभिनेत्याचा हा प्रवास सोपा नव्हता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विराजनं त्याचा संघर्षकाळ सांगितला आहे.

विराज जगतापनं सांगितला संघर्षकाळ

मुलाखतीदरम्यान विराज जगताप म्हणाला की, ‘माझी बालनाट्यापासून सुरुवात झाली. शाळेत असताना मी नाटकात काम केलेलं. माझं पाठांतर चांगलं होतं म्हणून सरांनी मला नाटकात घेतलेलं. १०वीच्या सुट्ट्यांमध्ये मी अभिनयाच्या शिबिरामध्ये गेलो. राजन कोठारकर यांनी बालनाट्य शिबीर घेतलेलं. तिथे मी पहिल्यांदा काम केलं आणि आम्ही गडकरीला प्रयोग केलेला. तिथे भेटलेल्या मित्रांनी मला एकांकिकेची ओळख करून दिली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही एकांकिका स्पर्धा केल्या. त्यानंतर ‘अनुभूती’ नाट्यसंस्था सुरू केली. त्यातूनच ओळख मिळाली.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘कॉलेज झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं म्हटल्यावर अडचणी सुरू झाल्या. घरच्यांचा सपोर्ट बंद झाला. जेव्हा स्वतःचा खर्च स्वतःच करायचा, असं घरच्यांनी सांगितलेलं तेव्हाही आम्ही एकांकिका करत होतो. आम्ही आठ-आठ तास एक वडा पाव खाऊन तालीम करायचो. कधी तरी एकमेकांसाठी डब्बा आणायचो. अनेक वर्ष आम्ही हे करत होतो. आम्ही एकमेकांचे कपडेही वापरायचो. नाटकाचा सेटही आम्ही बनवायचो. हातगाडीवर झोपायचो, तिकीट काउंटरच्या खाली झोपायचो, असे दिवस काढले आहेत.’

Maharashtra TimesStar Pravah Serial : दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्याला स्टार प्रवाहच्या मालिकेची भुरळ; मराठी शिकण्यासाठी दररोज बघतो मालिका
‘माझ्या घरी आम्ही खूप चांगला काळ पण बघितलेला, आणि आर्थिक तंगीसुद्धा बघितली आहे. रॉकेलसुद्धा पैसे नसायचे. घराला रंगकाम करायला पैसे नसायचे. त्यानंतर मग मी पार्ट टाइम जॉब करायला लागलो. पगार घरी द्यायचो. बाबा गेल्यानंतर हा संघर्ष थोड्या प्रमाणात होता. पण, नंतर हास्यजत्रा मिळाली आणि सगळे दिवस बदलले.’ असं विराजनं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराज जगताप बोलत होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलये“तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.
वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. “
आणखी वाचा