Maharashtra Weather Update 11 August Mumbai Pune Nashik Yellow Alert Meteorological Department Forecast; पावसाचा जोर ओसरला, पुढील काही दिवस हलक्या सरी, ऊन-सावल्यांचा खेळ सुरु; हवामान विभागाचा ताजा अंदाज
Maharashtra Weather Update 11 August Mumbai Pune Nashik Yellow Alert Meteorological Department Forecast; पावसाचा जोर ओसरला, पुढील काही दिवस हलक्या सरी, ऊन-सावल्यांचा खेळ सुरु; हवामान विभागाचा ताजा अंदाज
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असून मुंबई, पुणे, सातारा आणि कोकणातील घाटमाथ्यांवर तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ आणि श्रावणातल्या हलक्या सरी सुरू आहेत.
महाराष्ट्र मान्सून अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरात पुढील काही दिवस पावसाचा जोर फारसा वाढण्याची शक्यता नाही. ढगाळ अतिशय हलका ते हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. यासाठी घाट माथ्याला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढणार नाही
दरम्यान, शहराच्या बहुतांश भागांत तुरळक ते हलक्या सरी पडल्या. जिल्ह्यातील पावसाला जोर नव्हता. मात्र पुणे परिसरातील काही घाटमाथा भागांत तुलनेने अधिक पाऊस झाला. दोन दिवसांच्या तुलनेत शहरात दुपारी थोडा उकाडा वाढला होता. संध्याकाळी वारे सुटल्याने वातावरण सुसह्य होते. आकाशात ढग दाटून आले होते. शहरात दिवसभरात कमाल २८.९ आणि किमान २२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आयएमडीच्या स्थानिक अंदाजानुसार, पुणे आणि लगतच्या भागांत पुढील काही दिवसआकाश साधारणतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून अतिशय हलका ते हलका पाऊस पडू शकतो. अनुकूल वातावरण नसल्याने मध्य महाराष्ट्र, कोकणातही पावसाचा जोर वाढणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक (घाटमाथा), सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवसात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागानं नमूद केला आहे. मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना आणि सखल भागात जाताना काळजी घ्यावी. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि अपडेट्स जारी केले आहेत.
कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा