Headlines

Maharashtra Rain News,Maharashtra Rain Live Updates 6th July 2026 : राज्यात मुसळधार पाऊस, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंक टनेल प्रवेश इथे स्लॅब कोसळला, मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प – latest maharashtra news live 6th july 2026 maharashtra mumbai thane raigad weather update monsoon forecast schools closed today mumbai pune railway line jam ketan agarwal death case grandfather devichand agarwal passes away legislative council monsoon session



Lonavala Rain News : लोणावळ्यात आतापर्यंत इतिहासातील सर्वात जास्त सुमारे ६२५ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद

लोणावळ्यात आतापर्यंत इतिहासातील सर्वात जास्त सुमारे ६२५ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. हा एक देशातील विक्रम म्हणावा लागेल. लोणावळ्यासह मावळात अतिवृष्टी झाली आहे. मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली, मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब कोसळला, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह, जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने चारही मार्ग ठप्प झाले आहेत. मावळातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात, बंगल्यात पाणी घुसल्याने संसार पाण्यात गेले आहेत. हजारो लोक ठिकाण ठिकाणी पूराच्या पाण्यात अडकले आहेत. मळवली परिसराला समुद्राचे स्वरूप प्राप्त झाले असून, येथील घरे व बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले आहेत. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दगड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले आहेत. दरडीत अडकलेल्या रहिवाशांना जेसीबीच्या सहाय्याने युध्दपातळीवर पातळीवर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोणावळ्यातील टाटाचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लोणावळा शहर व परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी मध्यरात्रीपासून ठिकाण ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी व संपूर्ण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे . पवना धरण पाणलोट क्षेत्रात मागील २४ विक्रमी ३७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे असुन, मागील १२ तासांत १३ टक्के पाण्याची पातळी वाढली आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत