Headlines

Maharashtra Live News 1st July 2026 : दिवसभरातील आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर




Marathi News Live: मुंबईमध्ये आज, १ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. चालत्या शालेय बसवर झाड कोसळून एक विद्यार्थी ठार आणि चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. विहान श्रीवास्तव (११) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दुर्घटने जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांना चेंबूरमधील झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील दोघांचे सिटी स्कॅन करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.दरम्यान, व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाल्याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी चेतन चौधरी याची ‘गेट ॲनालिसिस’ (चालण्याचे विश्लेषण) चाचणी करण्याचा निर्णय पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत