Headlines

प्रियदर्शन यांचा कॉलम:देश, समाज, जीवनाची काळजी देखील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे




‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार‎आहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक‎आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांत‎शिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्च‎पेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशा‎विद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,‎यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मक‎बदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्या‎प्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्र‎विषयाचा अभ्यास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे,‎एक तर तिथे मानसशास्त्राचे प्राध्यापक राहिले नाहीत‎आणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तिथे प्रवेश घेणे बंद केले. ‎‎अखेर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमच बंद करून टाकला. ‎‎दुसऱ्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका सांगतात की,‎त्यांच्याकडे बॅचलर स्तरावरील विविध कोर्सेसमध्ये हिंदीचे ‎‎3,000 विद्यार्थी आहेत, पण त्यांना शिकवणारी केवळ‎एकच शिक्षिका आहे.‎ ही माहिती काही अपवादात्मक नाही. एके काळी सरकारी ‎‎विद्यापीठांत उत्तम प्राध्यापक असायचे. गोंधळ असूनही‎विद्यार्थी तिथे अभ्यास करायचे. तो गोंधळही त्यांच्या‎व्यक्तिमत्व विकासात काही प्रमाणात भरच घालायचा. ते‎विद्यार्थी आपल्या विषयातील तज्ज्ञतेसाठी जगभरात नाव‎कमवायचे. पण हळूहळू या यंत्रणेला गंज लागला.‎कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर नाही, तर राजकीय कृपेच्या‎आधारावर होऊ लागली. आता तर प्राध्यापकांच्या निवड‎प्रक्रियेतही उमेदवार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा‎समर्थक असावा, हीच कसोटी लावली जाते.‎ पूर्वी असे म्हटले जायचे की, विद्यापीठे अशी ठिकाणे‎आहेत जिथे 15-16 वर्षांचे अनेक संभाव्य गुन्हेगार प्रवेश‎घेतात, पण पुढच्या चार-पाच वर्षांत ते जबाबदार नागरिक‎बनून बाहेर पडतात. या ठिकाणी त्यांना विविध विषयांचे‎ज्ञान मिळायचे, राजकीय समज मिळायची, काही लक्षात‎राहण्याजोगे प्राध्यापक मिळायचे, काही आंदोलनांच्या‎आणि काही खोड्यांच्या आठवणी मिळायच्या. त्यांच्या‎व्यक्तिमत्त्वात काही टोकाची तीव्रता असेल, तर तिला‎घासून-पुसून माणुसकीचे रूप देण्याचे काम तिथे व्हायचे.‎ पण आता शिक्षण हा एक व्यापार बनला आहे. आता‎बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले विद्यापीठांत नाही, तर‎तांत्रिक संस्थांमध्ये जात आहेत. तिथे चार वर्षांत पदवी‎घेऊन त्यांना एक चकाकणारी नोकरी मिळवायची असते.‎त्यांना देश, समाज किंवा जीवनाबद्दल काहीही विचार‎करायचा नसतो, कोणत्याही आदर्शाच्या मागे लागायचे‎नसते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि कॅम्पस‎सिलेक्शनद्वारे कुठेतरी नोकरी मिळवून बाहेर पडायचे,‎एवढाच त्यांचा उद्देश असतो.‎ पण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसते. विद्यापीठे‎ही चांगले नागरिक घडवणारे कारखाने असतात. हे‎नागरिकत्व रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा‎इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र‎अभ्यासल्यामुळे येते, ज्याला ‘आर्ट्स फॅकल्टी’ किंवा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मानविकी विभाग म्हणतात. सर्वात जास्त दुर्दशा याच‎विभागाची झाली आहे. नेहमी असे मानले जाते की हुशार‎मुले सायन्स घेतात, पण गेल्या काही वर्षांत आर्ट्स च्या‎शिक्षणाला जणू धुळीत मिळवून टाकले आहे. स्पर्धा‎परीक्षांमध्ये येणाऱ्या इतिहास, भूगोल किंवा‎राज्यशास्त्राच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याचे काम आता‎कोचिंग संस्था करत आहेत.भारतात शालेय शिक्षण‎आधीपासूनच सामाजिक विषमतेचा आधार राहिले आहे,‎पण आता महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंतही हा‎शैक्षणिक विषमतेचा सिलसिला पोहोचला आहे. खासगी‎विद्यापीठांची चमकधमक खूप आहे, पण तिथे ना‎शिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, ना विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञान‎मिळते. या अंधारात काजव्यासारखे येणारे विदेशी‎विद्यापीठ आपल्या उच्च शिक्षणाचे खरे संकट किती‎सोडवू शकतील, हा एक मोठा प्रश्न आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ विद्यापीठे म्हणजे चांगले नागरिक घडवणारे‎कारखाने असतात. हे नागरिकत्व रसायनशास्त्र,‎भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा इतिहास, भूगोल,‎राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासल्यामुळे‎येते, ज्याला आर्ट्स फॅकल्टी किंवा ‘मानविकी‎शाखा विभाग म्हटले जाते. मात्र, सर्वात जास्त‎दुर्दशा याच विभागाची झाली आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत