Headlines

Maharashtra FDA: हे गुरेही खात नाहीत! अंगणवाडी आहाराची तपासणी करण्याची ‘एफडीए’कडे मागणी – anganwadi worker unions demand to fda to inspect meals


मुंबई: गर्भवती, स्तनदा माता आणि तीन ते सहा वर्षांच्या मुलांना अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ‘हा आहार लाभार्थी काय, गुरेही खात नाहीत,’ अशी तक्रार करत अन्न व औषध प्रशासनाने या आहाराचे नमुने तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘२०१८ पासून आहाराचे दर वाढलेले नाहीत.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने राज्यातील विविध भागांतील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला असता त्यांनी या तक्रारी मांडल्या. मुंबईसह राज्यातील विविध भागांतील अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार, मागील सहा-सात वर्षांपासून तांदूळ, डाळ, खिचडी, शिरा आदी आहाराबाबत तक्रारी आहेत. वास येणारी खिचडी, कमी साखरेचा बेचव शिरा आणि निकृष्ट दर्जाचे अन्न लाभार्थी नाकारतात. गर्भावस्थेत असा आहार घेतल्यास आरोग्याला धोका निर्माण होईल का, अशी शंका लाभार्थ्यांकडून उपस्थित केली जाते; तरीही हा आहार घेतलेल्या लाभार्थ्यांची छायाचित्रे घेऊन माहिती कळवण्याची जबरदस्ती प्रकल्प अधिकाऱ्यांकडून केली जाते. अन्न निकृष्ट दर्जाचे असेल, तर ते घेण्यासाठी लाभार्थ्यांवर दबाव कसा आणणार, असा प्रतिप्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे.

Maharashtra Timesलोकांना त्रास दिलात ना? भोगा आता! तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई; हाय कोर्टानं हॉटेलला सुनावलंग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आहार शिजवून देतात आणि शहरी भागामध्ये बचतगटांच्या माध्यमातून तयार आहार दिला जातो. आहाराचे दर २०१८मध्ये प्रती लाभार्थी आठ रुपये असे ठरवण्यात आले होते. त्यातील ६५ पैसे आहार शिजवण्यासाठी इंधनखर्च येतो. हे पाहता प्रति लाभार्थी आहार सात रुपये ३५ पैसे या दराने दिला जातो. त्यात कोणत्या गुणवत्तेचा आहार मिळणार? महाराष्ट्रात मुले आणि महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात पोषण आहार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सध्याच्या दरात आणि पुरवठा व्यवस्थेत त्याची पूर्तता होते का, याची चाचपणी होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीचे सचिव राजेश सिंग यांनी सांगितले.

Maharashtra TimesGaneshotsav 2026: देवाक काळजी रे! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा, एसटीच्या ‘ग्रुप बुकिंग’चे अतिरिक्त शुल्क रद्दसाडेसात रुपयांत काय देणार ?

सध्याच्या घडीला चहासाठी १० रुपये आणि वडापावसाठी २५ रुपये मोजावे लागत असताना साडेसात रुपयांत काय गुणवत्तेचा आहार देणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे.

चेहरा पडताळणीमध्ये त्रुटी
लाभाथ्यांच्या चेहरा पडताळणीतील अडचणीही अजून सुटलेल्या नाहीत. अनेक भागांत मोबाइल नेटवर्क नसणे, रेंजची समस्या, गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतर चेहरा पडताळणी न होणे, अशा अडचणी सेविकांना भेडसावत आहेत. त्यामुळे नोंदी पूर्ण करताना सेविकांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत