राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 2 जूलैला विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी ही घोषणा केली असून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा देखील दिलाय. यापुढे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता शेतीकामांसाठी गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’ पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री बावनकुळेंनी घेतल्यानं शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असून सरकारला कोणतेही शुल्क देण्याची गरज भासणार नाहीय. या संदर्भात आता जलसंपदा आणि जलसंधारण विभागाला कोणते आदेश देण्यात आलेत, कोणत्या गौण खनिजांबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, त्यासाठीचे नियम आणि निकष काय, सोबतच तुमच्या गावातील तलाठ्यावर कोणती मोठी जबाबदारी असणार आहे हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमाधून पाहणार आहोत.