Lonavala Chikki GI Tag: केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागाने या निर्णयाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे.

भौगोलिक मानांकनतज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. लोणावळा चिक्की संघ आणि माहूर येथील मंदिराचे पुजारी आणि तांबूल विक्रेते या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत जीआय प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
Pune News : आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला
‘माहूर गडावर नैवेद्याचा तांबूल करणारी सध्या केवळ सात कुटुंबे आहेत. आम्ही पिढ्यानपिढ्या हा नैवेद्य तयार करतो. पुरणपोळीइतकेच महत्त्व तांबूल नैवेद्याला आहे. त्याचे औषधी गुणधर्म पुराणात वाचायला मिळतात. ही परंपरा काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जीआय टॅगमुळे तांबूलला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, ’ अशी भावना तांबूल विक्रेते अमोल गवांडे यांनी व्यक्त केली.
ब्रिटिशांच्या काळातील गोड प्रवास
लोणावळा चिक्कीचा इतिहास ब्रिटिशकालीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीशी जोडलेला आहे. सन १८८२मध्ये भिवराज अग्रवाल आणि त्यांचा मुलगा मगनलाल आग्रा सोडून मुंबईत आले. पुढे सन १९००च्या सुरुवातीला कर्जत ते खंडाळा दरम्यान बोगदे खोदण्याचे आणि रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले, तेव्हा तिथे हजारो मजूर काम करीत होते. या मजुरांची भूक भागवण्यासाठी आणि त्यांना ताकद देण्यासाठी भिवराज यांनी गूळ, शेंगदाणे आणि मुरमुरे एकत्र करून ‘गूळदाणी’ तयार केली. स्वस्त आणि चविष्ट असल्याने अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील
हे मानांकन मिळविण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ, सांगणाऱ्या कागदपत्रांसह अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. उत्पादन वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे तज्ज्ञांना मान्य झाल्याशिवाय निर्णय होत नाही. चिक्की आणि तांबूलसाठी आम्ही तीन वर्षांपासून पाठपुरावा केला. – प्रा. गणेश हिंगमिरे, भौगोलिक मानांकनतज्ज्ञ

