Headlines

शहरांत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग, पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गांवर वेळ वाचणार; कुठे-कसे असतील मार्ग?| Maharashtra Times


Pune Road Projects: पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहे. या तिन्ही मार्गांचं भूमिपूजन शनिवारी होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे रस्ते प्रकल्प
पुणे: पुणेकरांचा वाहतूक कोंडीच्या समस्या आता लवकरच दूर होणार आहेत. शहरात तीन महत्त्वाच्या मार्गांचं भूमिपूजन शनिवार, १८ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितित होणार आहे. महाराष्ट्र राज्य व रस्ते विकास महामंडळ हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

पुणे-शिरूर महामार्ग, हडपसर ते यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन प्रकल्पांचं भूमिपूजन शनिवारी होणार आहे. १८ जुलै रोजी, दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रिडा मंच येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना अखेर वेग मिळणार आहे. त्यानंतर येत्या काही वर्षांमध्ये या मार्गांचं काम पूर्ण करून शहरातील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. पुण्यातील अत्यंत व्यस्त आणि वर्दळीच्या मार्गांवरील कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

Maharashtra TimesPune News: कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. भूमिपूजनाचा कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल यासाठी सर्व संबंधित विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुण्याती वाढत्या वाहतूक समस्यांचा सामना करण्यासाठी हे तिन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत असं भोसले यावेळी म्हणाले. हडपसर-यवत उन्नत मार्गावर वाहनांच्या मार्गासह मेट्रो मार्गाचाही समावेश आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि मेट्रो प्रशासन संयुक्तपणे या प्रकल्पावर काम करतील.

मार्गांचं बांधकाम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस यांची एक स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. हे तिन्ही प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

पुणे-शिरूर महामार्गाचा मार्ग कसा असेल?

पुणे-शिरूर उन्नत महामार्ग सहा पदरी असेल. एकूण ५३.४ किमी लाबम मार्गासाठी ७,३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर वाघोली येथे एका दुमजली उड्डाणपुलाचाही समावेश आहे. या नव्या महामार्गामुळे पुणे-नगर महमार्गावरील वाहतूककोंडी फुटणार आहे. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. प्रवासाचा वेळ केवळ २ तास ४५ मिनिटांवर येणार आहे.

हडपसर-यवत उन्नत मार्ग

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी ३१.५ किमी लांब हडपसर-यवत उन्नत मार्गाचं काम हाती घेतलं आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

Maharashtra TimesPune News: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एसआरए’ देणार ५१ हजार घरे, तीन वर्षांत १८० योजना पूर्ण होणार

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ते पुणे-नगर महामार्गापर्यंत थेट प्रवास शक्य करण्यासाठी या मार्गाचं बांधकाम होणार आहे. पुणे शहरातील अंतर्गत कोंडी बायपास करून प्रवास शक्य होणार आहे. हा मार्ग ५३.२ किमी लांब असेल व 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा