Headlines

Lock Upp 2:’गौरवऐवजी माझा पेट डॉग आला असता तरी चालला असता’, नवऱ्याची तुलना श्वानासोबत, आकांक्षा चमोलाचं आणखी एक वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांचा संताप


Akanksha Chamola Compare Gaurav Khanna with Dog:चर्चित आणि वादग्रस्त रिॲलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या जोरदार चर्चेत आहे. शो सुरू झाल्यापासूनच सर्व स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचा खुलासा करत आहेत.

Akanksha Chamola Compare Gaurav Khanna with Dog
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:’लॉक अप सीझन २’ या रिएलिटी शोमध्ये रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री आकांक्षा चमोलानं शोच्या सुरुवातीपासूनच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेले खुलासे चर्चेचा विषय ठरले आहेत. आता पुन्हा एकदा आकांक्षा तिच्या एका वक्तव्यामुळं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

आपला पती आणि प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याच्या शोमधील भेटीबद्दल बोलताना आकांक्षानं त्याला ‘स्ट्रेंजर’ (अनोळखी व्यक्ती) म्हणून संबोधलं आणि त्याच्याऐवजी कुटुंबातील कोणी किंवा पेट डॉग आला असता तरी चाललं असतं, असं म्हटलं. तिचं हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत असून नेटकरी तिला ‘फेम डिगर’ (प्रसिद्धीची भुकेलेली) म्हणत सुनावत आहेत.

नक्की काय घडलंय नेमकं?
शोमध्ये जेव्हा स्पर्धक धीरज धूपरची पत्नी विन्नी अरोरा आणि इतर कुटुंबीय भेटायला आले, तेव्हा कौटुंबिक भेटींबद्दल चर्चा सुरू होती. या वेळी सह-स्पर्धक श्रेया कालरा आणि शिल्पा शिंदे यांच्याशी संवाद साधताना आकांक्षानं गौरव खन्नाच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली.

Maharashtra TimesAshadhi Wari: नख उपटल्यानं पायाला जखम झाली होती, एका छोट्या रूपा नावाच्या मुलीनं त्यावर पट्टी लावली, आदेश बांदेकरांनी वारीत अनुभवली मनाची श्रीमंती
आकांक्षा म्हणाली की, गौरव माझ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आला होता. माझ्यासाठी तर तो ‘एक्स’ आणि स्ट्रेंजरसारखाच आहे. त्याच्या ऐवजी माझ्या कुटुंबातील दुसरं कुणी आलं असतं, तर मला बरं वाटलं असतं,कम्फर्ट मिळाला असता. माझी आई, वडील किंवा माझा पाळीव कुत्रा जरी आला असता, तरी मला जास्त आनंद झाला असता. तिच्या या वक्तव्यानंतर शोमधील इतर सदस्य हसू लागले असले, तरी बाहेर सोशल मीडियावर मात्र यावरून तिच्यावर टीका केली जात आहे.

नेटकऱ्यांचा संताप
आकांक्षानं आपल्या पतीची तुलना थेट श्वानासोबत केल्यामुळं प्रेक्षक आणि गौरव खन्नाचे चाहते प्रचंड संतापले आहेत.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी तिला चांगलंच सुनावलं आहे.

Maharashtra TimesAastad Kale Video Post: ‘सगळे बाजारात विकून घ्यायला बसलेले नाहीत’आस्ताद काळेच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा, ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं
‘फेम डिगर’
गौरव खन्नाच्या नावाचा वापर करून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती शोमध्ये आली आहे. गौरवच्या नावाशिवाय तिच्याकडं दुसरा कोणता गेमच नाही. अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना पतीला ‘स्ट्रेंजर’ म्हणणं आणि त्याची तुलना श्वानाशी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, आकांक्षा एक ‘फेम डिगर’ आहे, अशा कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

घटस्फोटाचा खुलासा आणि नात्यातील दुरावा
आकांक्षा आणि गौरव खन्ना याचं लग्न विवाह २४ नोव्हेंबर २०१६ रोजी झालं होतं. मात्र ‘ लॉक अप २ ‘ च्या प्रीमियर एपिसोडमध्ये आकांक्षानं ते दोघे गेल्या काही काळापासून वेगळं राहत असून घटस्फोट घेणार असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर फॅमिली वीकदरम्यान गौरव खन्नाने शोमध्ये हजेरी लावून आकांक्षाची भेट घेतली होती. त्या वेळी गौरवनं आपण अद्याप कायदेशीररीत्या विभक्त झालो नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि शोमध्ये वैयक्तिक गोष्टी जाहीर केल्याबद्दल तिची कानउघाडणीही केली होती.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा