Headlines

LIC OFS Retail Discount; शेअर बाजारात सुरू झालाय Offer For Sale; सरकारचा मोठा डाव, फक्त 382 रुपयांना मिळतोय ‘हॉट’ स्टॉक


LIC OFS 2026: भारताची सर्वात मोठी विमा कंपनी – LIC – चा ऑफर फॉर सेल शेअर मार्केटमध्ये 4 ऑगस्ट रोजी उघडला आहे आणि पहिल्या दिवशी या ओएफएसला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. किरकोळ गुंतवणूकदार आज यात सहभागी होऊ शकतात आणि एलआयसीचे शेअर्स 10 च्या सवलतीने खरेदी करू शकतात.

LIC OFS Update Today 5 August 2026
LIC OFS Update: भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) केंद्र सरकारने आपला हिस्सा ऑफर फॉर सेलद्वारे विक्रीस ठेवला असून हा OFS आदल्या दिवशी, 4 ऑगस्ट रोजी, उघडला आणि किरकोळ गुंतवणूकदार आज OFS शेअर्ससाठी बोली लावू शकतात. तुम्हालाही या OFS द्वारे LIC चे शेअर्स खरेदी करायचे असतील, तर तुम्ही बुधवार सकाळी शेअर मार्केटची ओपनिंग 9:15 ते दुपारी 3:30 दरम्यान बोली लावू शकता.

एलआयसी OFS साठी अर्ज करायचा

तुम्ही झिरोधा, ग्रो किंवा एंजल वन यांसारख्या स्टॉकब्रोकर ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करून अर्ज करू शकता. तुम्हाला तुमच्या ब्रोकरेज ॲपमधील कॉर्पोरेट ॲक्शन्स किंवा OFS विभागात जाऊन एलआयसी ओएफएस निवडा. त्यानंतर तुम्ही शेअर्सची इच्छित संख्या आणि तुमची बिड प्राईस टाकून, किंवा थेट कट-ऑफ प्राईस टाकून तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

Maharashtra Timesपटापट पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असाल तर आता वेळ लागणार, डिजिटल पेमेंटची पद्धत बदलली
एलआयसीने आपल्या ओएफसीसाठी 382 रुपये किमान किंमत निश्चित केली असून सेबीची किमान 10% सार्वजनिक हिस्सेदारीची अट पूर्ण करण्यासाठी ओएफएस लाँच केला गेला आहे.

सरकारने 4% ग्रीनशू ऑप्शनचा वापरल्यामुळे एलआयसीच्या OFS चा आकार लक्षणीयरीत्या वाढला आहे, जे गुंतवणूकदारांकडून संभाव्य जोरदार मागणीमुळे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. अशाप्रकारे, देशांतर्गत बाजारपेठ आता OFS आणि सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेला मिळणाऱ्या गुंतवणूकदारांच्या प्रतिसादावर बारकाईने लक्ष ठेवून असेल.

Maharashtra Timesआता बचतही होणार अन् फायदाही; HDFC बँकेने महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी आणली विशेष स्कीम

एलआयसी शेअर क्रॅश

दरम्यान, ओएफएसची घोषणा केल्यावर मंगळवारी एलआयसी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.सरकारने ओएफएसची किमान किंमत 382 रुपये निश्चित केल्यावर स्टॉक 8.9% घसरून जवळपास चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घरंगळला, तर याआधी सोमवारी एलआयसी शेअर 428 रुपयांवर क्लोज झालेला.

Maharashtra Times12 वर्ष जुना पीएफचा मोठा नियम बदलला; आता 25 हजारांपर्यंत ‘बेसिक’ असणाऱ्यांनाही पेन्शन, कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?अशाप्रकारे, तुम्हालाही OFS द्वारे ओएफएसद्वारे खरेदी करायचा असेल तर, OFS मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना 10 रुपयांची सूट दिली जात आहे, जी कट-ऑफ किमतीवर लागू असेल. तसेच, गुंतवणूकदारांना कमाल 2 लाख बोली लावावी लागेल आणि अर्ज करताना तुमच्या ट्रेडिंग खात्यात 100% फंड असला पाहिजे. लक्षात घ्या की, रिटेल कोट्याची मागणी उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त असल्यास शेअर्सचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाऐवजी प्रमाणानुसार केले जाईल.