Headlines

latest maharashtra news live 7th july 2026 maharashtra Mumbai Pune Nashik red alert weather update monsoon forecast today schools closed Mumbai local; पावसाने मुंबईसह अनेक जिल्ह्यांना झोडपलं, नाशिकला रेड अलर्ट, वसई-विरार लोकलसेवा विस्कळीत



Mumbai News : १५ दिवसांत एक हजार झाडांची पडझड, मुंबई शहर, उपनगरांत 1300हून अधिक झाडे क्षतिग्रस्त

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांबरोबरच घर कोसळणे आणि अन्य दुर्घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत ११ जणांनी जीव गमावला असून, २२ जण जखमी झाले आहेत. २२ जून ते ६ जुलै या कालावधीत एक हजारापेक्षा जास्त झाडे कोसळली, तर १३००हून अधिक झाडांच्या फांद्या कोसळल्या. मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत असून, महापालिकेच्या पावसाळापूर्व धोकादायक झाडे, फांद्या छाटणीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. रविवारी विविध ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांमध्ये एकूण दहा जण जखमी झाले. मुंबई महापालिका विविध प्राधिकरणांसोबत पावसाळापूर्व बैठका घेते आणि वेळोवेळी कामाचा आढावा घेतला जातो. मात्र, यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका आता मुंबईत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून केली जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत