![]()
Kothrud SRA Project : कोथरुड ‘एसआरए’त 100 कोटींचा घोटाळा; सुनील कांबळेंचा गंभीर आरोप, शंभुराज देसाईंकडून खंडन
कोथरूडमधील गोसावी वस्ती झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांची नावे घुसवून सुमारे १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला गेला, असा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. मंत्री शंभुराज देसाई यांनी आरोप फेटाळले. ‘ठोस पुरावे दिल्यास चौकशी करू,’ असे ते म्हणाले. या प्रकल्पात कोणताही अतिरिक्त ‘टीडीआर’ किंवा मुक्त विक्री क्षेत्राचा लाभ दिलेला नाही, असा दावा सरकारने केला.
