Headlines

latest maharashtra news live 3rd july 2026 maharashtra Mumbai monsoon update forecast Maharashtra Mumbai orange alert rain live updates monsoon session of vidhan sabha; मुंबईला पावसाने झोडपलं, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या



Mumbai Rains : मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, तीन तासांसाठी IMD चा ऑरेंज अलर्ट, लोकल वाहतूक मंदावली, सखल भागही जलमय

मंगळवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात पावसाने केलेला मुक्काम शुक्रवारीही कायम आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगर भागात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या शहरातही मुसळधार पाऊस आहे, तर नवी मुंबईतील वाशी-पनवेल परिसरातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई, नालासोपारा, विरार भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलची वाहतूकही संथ गतीने सुरु आहे. सखल भाग जलमय झाल्यामुळे रस्ते वाहतूकही काहीशी मंदावली आहे. शुक्रवारच्या पावसाने अनेकांना वीकेंडच्या मान्सून ट्रिपचे वेध लागले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत