Headlines

Kuku Kohli : अरुणा इराणी यांचे पती दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला जगाचा निरोप


Kuku Kohli Passes Away : अरुणा इराणी यांचे पती आणि दिग्दर्शक कुकू कोहली यांचं वयाच्या ७७व्या वर्षी निधन झालं असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Kuku Kohli Passes Away
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणला पहिली संधी देऊन त्याला रातोरात स्टार बनवणारे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुकू कोहली यांचं खरं नाव संदेश कोहली होतं आणि ते अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनानं बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कुकू कोहली यांचं निधन

चित्रपट निर्माते आणि जवळचे मित्र अशोक पंडित यांनी कुकू कोहली यांच्या निधनाची बातमी केली. त्यांनी सांगितलं की, कोहली यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्यांना वाचवता आलं नाही. पंडित यांनी पुढे सांगितलं की, कुकू कोहली यांची प्रकृती उत्तम होती. कुकू कोहली अनेक वर्षांपासून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी होते.

Maharashtra TimesShekhar Phadke : ‘काही चॅनलवर मला काम मिळत नाही, 10-12 वर्षांपूर्वी न सांगता मालिकेतून काढण्यात आलेलं’, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य
कुकू कोहली यांचा जन्म ४ जून १९४९ रोजी पेशावर येथे झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केलं. ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘प्रेम रोग’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत काम करताना त्यांना दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी राहुल रवैल यांच्यासोबतही काम केलं. ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘बेताब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नवोदित कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.

Maharashtra TimesKriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर
कुकू कोहली यांच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘फूल और कांटे’ हा सिनेमा. या चित्रपटातून अजय देवगणनं अभिनेता म्हणून पदार्पण केलं. अजय देवगण हा या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता. कुकू कोहली यांनी २०२५ मधील एका मुलाखतीत सांगितलेलं की, सुरुवातीला अक्षय कुमारची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती आणि त्याची चित्रपटासाठी निवडही झाली होती. मात्र, काही कारणांमुळे त्याला प्रोजेक्टमधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर कुकू कोहली यांनी अजय देवगणला संधी दिली. अजय देवगणनंही नंतर एका मुलाखतीत कुकू कोहलींचे कौतुक केलं होतं. ‘फूल और कांटे’च्या यशानंतर कुकू कोहली यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यातील ‘सुहाग’ हा विशेष महत्त्वाचा ठरला. १९९४ मध्ये आलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसले.

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

करिश्मा कपूर आणि नगमा यांच्याही प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुहाग’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा १९९४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. पुढे अजय आणि अक्षयची जोडी अनेक चित्रपटांमध्ये पुन्हा पाहायला मिळाली. यानंतर कुकू कोहली यांनी ‘झुल्मी’, ‘अनारी नंबर १’, ‘ये दिल आशिकाना’ आणि ‘वो तेरा नाम था’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. मात्र, ‘फूल और कांटे’ आणि ‘सुहाग’ने मिळवून दिलेली लोकप्रियता त्यांच्या पुढील चित्रपटांना मिळाली नाही.

Maharashtra TimesRajiv Kapoor : ‘कपूर’ घराण्यातील अभिनेता, अपयशाचं खापर वडिलांवर फोडलं, लग्नाच्या 2 वर्षात काडीमोड अन् दारूच्या आहारी; वयाच्या 58व्या वर्षी मृत्यू
कुकू कोहली त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. अभिनेत्री अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांनी १९९० मध्ये लग्न केलं. त्यांच्या नात्याची सुरुवात चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दरम्यान, कुकू कोहली यांच्या निधनानं अरुणा इराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहते आणि कलाकार दिग्दर्शकाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा