Kshama Deshpande : ‘बाबांना अर्धांगवायूचा झटका, अनेक वर्ष एकाच जागी, माझा हात हातात असताना बाबांनी प्राण सोडला’, क्षमा देशपांडेनं सांगितला हृदयद्रावक प्रसंग
Kshama Deshpande : ‘बाबांना अर्धांगवायूचा झटका, अनेक वर्ष एकाच जागी, माझा हात हातात असताना बाबांनी प्राण सोडला’, क्षमा देशपांडेनं सांगितला हृदयद्रावक प्रसंग
Kshama Deshpande Exclusive : मराठी अभिनेत्री क्षमा देशपांडेनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वडिलांची आठवण सांगितली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री क्षमा देशपांडे सध्या अमोल कोल्हे यांच्या ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेमध्ये झळकत असून तिनं या मालिकेमध्ये सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. यापूर्वी अभिनेत्रीनं अनेक मालिकांमध्ये काम केलंय. वैयक्तिक आयुष्यात अडचणी असल्या तरी त्यावर मात करून खंबीरपणे उभं राहणारे काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यापैकीच क्षमा देशपांडेसुद्धा आहे. अभिनेत्री लहान असताना तिच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आलेला. त्यानंतर अनेक वर्ष ते एका जागेवर होते. या कठीण प्रसंगाबद्दल क्षमा देशपांडेनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
क्षमानं सांगितली बाबांची आठवण
मुलाखतीदरम्यान क्षमा देशपांडे म्हणाली की, ‘मी चार वर्षांची असताना बाबांना अर्धांगवायूचा झटका आलेला. त्यावेळी ९०% त्यांची बॉडी पॅरलाईज झालेली. त्यामुळे, त्यानंतर माझ्या आईने संपूर्ण घर सावरलं. मला मोठा भाऊ आहे, आजीही होती, माझं शिक्षण होतं. पण, आईने आम्हाला कसलीच कमी भासू दिली नाही. १५-१६ वर्ष बाबा पॅरलाईज्ड होते, त्यांची वाचा गेलेली. ते कसे हाक मारत असतील, हे मला माहीतच नाही.’
‘एकदा असंच मी त्यांना चालवत होते आणि त्यांचा तोल गेला. तेव्हा मी त्यांना घट्ट मिठी मारली, त्यांनी पाच मिनिटं ती मिठी सोडली नाही, त्यांना विश्वास वाटला. मला अजूनही ते सगळं आठवतं. पहिल्यांदा मी एक बाप म्हणून त्यांना मिठी मारलेली. त्यांच्या शेवटच्या क्षणी मी त्यांच्या शेजारी बसलेले. मी मनातल्या मनात बोलत होते, ‘मी लहान असल्यामुळे तुम्हाला समजू शकले नाही. पण तुम्ही यापुढे इथून कुठेही असाल मी तुम्हाला आठवत राहीन, तुमचं माझ्यावर लक्ष असुद्या.’ तेव्हा मी बाबांचा हात घट्ट धरलेला आणि त्या क्षणी बाबांनी जीव सोडला. ती चांगली आठवण की वाईट हे मला आजतागायत समजलेलं नाही. लहानपणी मला एखादं बक्षीसमिळालं की, ते खूप खुश व्हायचे. आज हे सगळं पाहून बाबा खूप खुश असतील.’ असं क्षमानं शेवटी सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा