Headlines

ketan agrawal murder case defence lawyer says no direct evidence against siya goyal; सियाला शिक्षा होणार की नाही? ‘ठोस पुरावाच नाही’ म्हणत वकिलाचा मोठा दावा, म्हणे ‘या’ दोन गोष्टी न्यायालयात टिकणार नाही


Siya Goyal Lawyer Claim : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा कायदेशीर ट्विस्ट निर्माण होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. आरोपी सियाविरोधात ठोस पुरावाच नाही, असा बचाव पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता २९ जूनच्या सुनावणीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Siya Goyal Lawyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान नवे कायदेशीर मुद्दे समोर येऊ लागले आहेत. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला ढकलून हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिया गोयलच्या बचाव पक्षाने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सियाविरोधात कोणताही ठोस स्वतंत्र पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला असून, त्यामुळे या प्रकरणात न्यायालयात कोणते पुरावे टिकतील, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, सिया गोयलचे वकील ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, भारतीय पुरावा कायद्यानुसार पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात थेट ग्राह्य धरला जात नाही, असा त्यांचा दावा आहे.

उपस्थित केला कायदेशीररित्या महत्त्वाचा मुद्दा

बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या आरोपीने पोलिसांसमोर दिलेला जबाब न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारला जावा, यासाठी तो दंडाधिकाऱ्यासमोर कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदवला जाणे आवश्यक असते. त्यामुळे केवळ पोलिसांच्या तपासातील कबुलीजबाबावर दोष सिद्ध होऊ शकत नाही, असेही वकिलांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र पुरावा नसल्याचा केला दावा

सिया गोयलविरोधात पोलिसांकडे कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा थेट पुरावा नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. त्यामुळे न्यायालयात पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांची कसून पडताळणी होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, या दाव्यांवर पोलिस किंवा सरकारी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Maharashtra TimesSiya Goyal : सियाच्या जवळच्या दोन मैत्रिणींची चौकशी होणार, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठे गुपित उलगडणार

२९ जूनच्या सुनावणीकडे लक्ष

वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, सिया गोयल तपासात सहकार्य करत असून तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर २९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयीन कोठडीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारी पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. दुसरीकडे बचाव पक्ष कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपली बाजू मांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे २९ जूनच्या सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा