Kangana Ranaut Post : स्वतःच्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौत संतापली असून अभिनेत्रीनं ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच, कंगनाच्या ‘गटर जनरेशन’ या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सिनेमातील भूमिकांमुळेही कंगना ट्रोल झाली. यावर आता अभिनेत्रीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीवर संसदेतील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. मंडीमधून भाजपची खासदार झाल्यानंतर, संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिच्या चित्रपटांतील सीन व्हायरल करण्यावर अभिनेत्रीनं आक्षेप घेतला होता. कंगना म्हणाली की, पडद्यावर ग्लॅमरस किंवा बोल्ड भूमिका साकारण्यात काहीही विचित्र किंवा चुकीचं नाही, कारण एक कलाकार म्हणून तेच तिचं काम आहे. या व्हिडिओसोबत तिनं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या चित्रपटांतील भूमिकांवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.
Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?
कंगनाचा ट्रोलर्सवर निशाणा
कंगना रणौतनं लिहिलं की, ‘तरुणांची दिशाभूल करू नका. या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. तुम्हाला माझ्या चित्रपटांतील भूमिकांचे व्हिडिओ वापरायचे आहेत, त्यासाठी मला लाखो रुपये मिळाले आहेत किंवा मोठ्या शो-बिझनेस कार्यक्रमांमधील व्हिडिओ वापरताय, जिथे माझ्याभोवती माझ्या टीमची आणि इव्हेंट प्लॅनर्सची खूप मोठी सुरक्षा असते. तुम्ही त्याचा वापर करून रस्त्यावर, शाळेच्या कार्यक्रमांमध्ये किंवा गलिच्छ क्लबमध्येही त्याच गोष्टी करू शकता? हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का?आज तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांची दिशाभूल करत आहात, उद्या तुमच्या मुलांची दिशाभूल होऊ शकते.’
कंगना रणौतची जेन झींवर टीका
काही दिवसांपूर्वी, कंगना रणौतनं सोशल मीडियावर जेन झींना ‘गटर जनरेशन’ म्हटलं होतं. कंगना म्हणाली की, ‘आजकालच्या मुली ड्रग्स घेण्याचं, दारू पिण्याचं किंवा असंख्य लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानानं मिरवतात आणि आपल्या पालकांच्या कमाईवर जगतात.’ कंगना रणौतच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकारणातही गोंधळ उडाला. Meena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा दरम्यान, कंगना रणौतच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘मणिकर्णिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंगनानं तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्री आता ‘क्वीन’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा