Headlines

Kangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप


Kangana Ranaut Post : स्वतःच्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौत संतापली असून अभिनेत्रीनं ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत.

Kangana Ranaut On Trollers
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच, कंगनाच्या ‘गटर जनरेशन’ या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सिनेमातील भूमिकांमुळेही कंगना ट्रोल झाली. यावर आता अभिनेत्रीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीवर संसदेतील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. मंडीमधून भाजपची खासदार झाल्यानंतर, संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिच्या चित्रपटांतील सीन व्हायरल करण्यावर अभिनेत्रीनं आक्षेप घेतला होता. कंगना म्हणाली की, पडद्यावर ग्लॅमरस किंवा बोल्ड भूमिका साकारण्यात काहीही विचित्र किंवा चुकीचं नाही, कारण एक कलाकार म्हणून तेच तिचं काम आहे. या व्हिडिओसोबत तिनं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या चित्रपटांतील भूमिकांवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?

कंगनाचा ट्रोलर्सवर निशाणा

कंगना रणौतनं लिहिलं की, ‘तरुणांची दिशाभूल करू नका. या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. तुम्हाला माझ्या चित्रपटांतील भूमिकांचे व्हिडिओ वापरायचे आहेत, त्यासाठी मला लाखो रुपये मिळाले आहेत किंवा मोठ्या शो-बिझनेस कार्यक्रमांमधील व्हिडिओ वापरताय, जिथे माझ्याभोवती माझ्या टीमची आणि इव्हेंट प्लॅनर्सची खूप मोठी सुरक्षा असते. तुम्ही त्याचा वापर करून रस्त्यावर, शाळेच्या कार्यक्रमांमध्ये किंवा गलिच्छ क्लबमध्येही त्याच गोष्टी करू शकता? हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का?आज तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांची दिशाभूल करत आहात, उद्या तुमच्या मुलांची दिशाभूल होऊ शकते.’

Kangana Ranaut Post

कंगना रणौतची जेन झींवर टीका

काही दिवसांपूर्वी, कंगना रणौतनं सोशल मीडियावर जेन झींना ‘गटर जनरेशन’ म्हटलं होतं. कंगना म्हणाली की, ‘आजकालच्या मुली ड्रग्स घेण्याचं, दारू पिण्याचं किंवा असंख्य लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानानं मिरवतात आणि आपल्या पालकांच्या कमाईवर जगतात.’ कंगना रणौतच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकारणातही गोंधळ उडाला.
Maharashtra TimesMeena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा
दरम्यान, कंगना रणौतच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘मणिकर्णिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंगनानं तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्री आता ‘क्वीन’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.