Headlines

Kangana Ranaut : ‘मी भाजपची कळसुत्री बाहुली नाही’, कंगना रणौतचं वक्तव्य; म्हणाली, ‘पक्ष आज माझ्यासोबत आहे, उद्या नसेल’


Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच एका मुलाखतीत ती जी काही बेधडक वक्तव्य करते, त्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच मी कुणाची कठपुतळी नाही, असंही कंगना म्हणाली आहे.

Kangana Ranaut On BJP
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आजकाल तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अशातच आता एका मुलाखतीत कंगना म्हणाकी की, ती भाजपची कठपुतळी नाही आणि पक्ष तिला पाठिंबा देईलच असं नाही. तसेच ती आजही अनेक दिग्दर्शकांच्या आवडती अभिनेत्री आहे, असं कंगना म्हणाली.

‘भाजप’बद्दल काय म्हणाली कंगना?

‘तुम्ही जी काही वक्तव्य करता, ती भाजपची अधिकृत भूमिका असते की तुमची स्वतःची?’ असं विचारलं असता कंगना म्हणाली, ‘मी माझ्या पक्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतेय, असं नाहीये. पण त्याच वेळी मला असं वाटतं की, जेव्हा खूप गोंधळ असतो, तेव्हा ओरडायलाच हवं. मी कधीकधी कठोर विधानं करते, पण मी ते मुद्दाम करत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, मी कोणाची कळसुत्री बाहुली नाही. भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या असेल किंवा नसेल. मी दोन वर्षे खासदार राहिले आहे. मी २० वर्षे एक कलाकार आहे. माझं एक अस्तित्व आहे. मी उभी राहिले, तर २० पत्रकार मला ऐकायला येतील.’

Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?

कंगना पुढे म्हणाली, ‘मी नेहमीच म्हटलं आहे की, माझे विचार माझे स्वतःचे आहेत, माझी विचारधारा माझी स्वतःची आहे. ती अचानक नाहीशी होऊ शकत नाही. मी तसा प्रयत्न करते आणि मला कधीही दिखावा करावा लागत नाही. पण हो, कधीकधी चढ-उतार असू शकतात, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, पण मी अजून नवीन आहे आणि या गोष्टी थोड्या शिकतेय.’

Maharashtra TimesOmkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ
पुढच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला तिकीट मिळणार नाही, अशी भीती तुम्हाला कधी वाटते का? असं विचारलं असता कंगना म्हणाली, ‘मी याला भीती म्हणू शकत नाही. मला भीती वाटते की, मला तिकीट मिळणार नाही किंवा माझं अस्तित्वच संपून जाईल. मी एक अभिनेत्री, चित्रपट निर्माती, लेखिका आहे आणि मला माझं काम खूप आवडतं. मी अनेक दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. त्यापैकी बरेच जण वाट बघतायत. ते मला विचारतात की, मी इंडस्ट्री का सोडली? आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे.’ ‘डीडी’न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कंगना बोलत होती.