Headlines

Kamya Punjabi : ‘माझ्या अंतर्वस्त्रांवर त्यानं कमेंट केली’, लोकप्रिय अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर आरोप, सांगितला मालिकेच्या सेटवरील प्रसंग


Kamya Punjabi : लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकत्याच एका मुलाखतीत मालिकेच्या सेटवरील प्रसंग सांगितला आहे.

Kamya Punjabi Allegations On Director
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री काम्या पंजाबी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं तिच्या संघर्षाबद्दल आणि करिअरबद्दल सांगितलं आहे.

काम्या पंजाबीनं सांगितला प्रसंग

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत काम्या म्हणाली की, ”कथा है दिल’ ही माझी पहिली मालिका होती. मी त्या मालिकेत अमन वर्माच्या मुलीची भूमिका साकारली होती. मालिकेचा दिग्दर्शक माझ्यासकट काही कलाकारांना त्रास द्यायचा. मला मेकअप रूममधून बाहेर पडून सेटवर जावंसं वाटायचं नाही. मी मालिकेमुळे खूप आनंदी होते. पण तो गंमतीनं अशा गोष्टी बोलायचा, ज्या मी शब्दातही सांगू शकत नाही. एक शॉट होता, ज्यात मी जिन्यावरून धावत खाली येत होते आणि त्याने माझ्या अंतर्वस्त्रांवर कमेंट केली. तो अशा गोष्टी बोलायचा, त्यामुळे मला भीती वाटायची. सेटवर खूप मोठे कलाकार होते. मला वाटलं होतं की, मी त्यांच्याकडून काहीतरी शिकेन. पण दिग्दर्शक अशा गोष्टी बोलायचा, ज्यामुळे मला भीती वाटायची.’

Maharashtra TimesTukaram Mundhe On Pan Masala Ad : FDA नं अजय, शाहरुख आणि टायगर यांना केलं सॉफ्ट टार्गेट? तुकाराम मुंढे म्हणाले, ‘उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई सुरू आहे’
काम्या म्हणाली, ‘मी खूप आजारी होते. माझ्या काकांना टीबी झालेला आणि नंतर मलाही झाला. माझ्या आई-वडिलांनी मला वाढवताना खूप संघर्ष पाहिला आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. मला आठवतंय, मी हॉस्पिटलमध्ये झोपले होते. माझे वडील रडत होते. ते दृश्य माझ्या मनातून जात नाही. माझ्या अन्ननलिकेची शस्त्रक्रिया झाली. माझ्या आईने तिचे सर्व दागिने, अगदी मंगळसूत्रसुद्धा विकलं. माझं कुटुंब खूप चांगलं आहे. एक काळ असा होता जेव्हा आमच्याकडे गणपती विकत घ्यायलाही पैसे नव्हते.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

दरम्यान, काम्या पंजाबी ‘बिग बॉस ७’ मध्ये सहभागी झाली होती. अरमान कोहलीसुद्धा त्या सीझनचा एक भाग होता. अरमान आणि काम्यामध्ये अनेक वाद झाले होते.

Maharashtra TimesOmkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ
काम्याने अरमान कोहलीवरही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘अरमान कोहली खूप बडबडा होता. तो आता कसा आहे हे मला माहीत नाही. तो काहीही बोलायचा. तो शिवीगाळ करायचा. पण १०-१५ मिनिटांतच तो माफी मागायचा. पण काही काळानंतर त्या माफीचा काही उपयोग होत नाही. पण मला माहीत होतं की तो वाईट स्वभावाचा नाही. तो आपला राग आवरू शकत नव्हता. त्याच्या रागावर त्याचं नियंत्रण नव्हतं.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा