Headlines

Jet Airways Founder Naresh Goyal Bankruptcy; कधी शेकडो कोटींमध्ये खेळणारा आता ना घर का ना घाट का; कडकीनंतर कोर्टात हात जोडले, रडले; जेट एअरवेज का बुडाली?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Jet Airways Founder Downfall: काळाचं चक्र फिरलं की कोणावर कशी परिस्थिती ओढवेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल एकेकाळी विमान वाहतूक विश्वाचे सम्राट मानले जायचे, पण मग नशिबाने अशी थट्टा केली की हतबल झालेले अब्जाधीश नरेश गोयल यांना कोर्टात न्यायाधीशांसमोर हात जोडून ‘मृत्यूची भीक’ मागावी लागली.

Naresh Goyal Jet Airways Success and Downfall
जेट एअरवेज का बुडाली?
Billionaire Downfall: श्रीमंत होणं किंवा गरीब होणं एका रात्रीत घडत नाही. यासाठी आर्थिक सवयी, निर्णय, योग्य नियोजन आणि परिस्थिती असे घटक कारणीभूत असतात. काळ वेगाने बदलतो आणि रावाचा रंक कधी होईल, कोणीच सांगू शकत नाही. सुख-दुःख, विजय-पराजय, धन-दारिद्र्य या सर्वांचा अनुभव सगळं उभ्या आयुष्यातच पाहावं लागतं. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल एकेकाळी एअरलाईन्स विश्वाच्या शिखरावर पोहोचलेले, पण नंतर काळाचं चक्र फिरलं आणि रावाचा रंक झाला.

नरेश गोयल यांच्या अडचणी संपेना

नरेश गोयल यांच्या अडचणी संपेना

एकेकाळी जेट एअरवेज भारतासह जगभरात विमानसेवा चालायची. पण मग परिस्थिती इतकी बदलली की या एअरलाइनची सर्व विमाने ग्राऊंडेड केली गेली. दिवाळखोर जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याच्या अनेक चर्चा झाल्या, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरले. प्रचंड कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरवेजचे नामोनिशान मिटले तर, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल अक्षरशः हतबल झाले.

कोर्टासमोर अब्जाधीशाची ‘मृत्यू’साठी विनवणी

कोर्टासमोर अब्जाधीशाची ‘मृत्यू’साठी विनवणी

जेट एअरवेज दिवाळखोर झाली आणि आज या एअरलाईन्सचे नाव कदाचितच कोणाच्या लक्षात असेल. नरेश गोयल सध्या न्यायालयीन तसेच आयुष्याची लढाई लढत आहेत. कॅनरा बँकेविरुद्ध फसवणुकीच्या आरोपांवरून मुंबईतील विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान नरेश गोयल यांनी हात जोडून न्यायाधीशांना विनवणी केली, “मी तुरुंगातच मेलो तर बरे होईल.”

कोर्टात ढसाढसा रडले गोयल

कोर्टात ढसाढसा रडले गोयल

कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नरेश गोयल यांनी मुंबईतील विशेष न्यायालयातसांगितले, “माझी जगण्याची आशा संपली आहे. माझी प्रकृती खूपच खालावली आहे, त्यामुळे तुरुंगातच मरणे बरे,” असं म्हणून त्यांनी न्यायाधीशांसमोर हात जोडले. गोयल पुढे म्हणले की मला माझी पत्नी – अनिता – ची आठवण येते, जी कर्करोगाशी झुंज (आता मृत) देत असून शेवटच्या टप्प्यात आहे.” त्यावर न्यायाधीश म्हणाले, “तुम्हाला निराधार सोडले जाणार नाही.” नरेश गोयल यांना या प्रकरणात सप्टेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती तर, सध्या वैद्यकीय कारणामुळे जामीन दिला गेला असून मे 2026 मध्ये एका विशेष PMLA न्यायालयाने त्यांना ‘मॅलिग्नंट न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर’च्या (घातक न्यूरोएंडोक्राइन गाठीच्या) विशेष पुनर्तपासणी आणि उपचारासाठी चार आठवडे लंडनला जाण्याची परवानगी दिलेली.

जेट एअरवेज उद्धवस्त कशी झाली?

जेट एअरवेज उद्धवस्त कशी झाली?

जेट एअरवेज कधीकाळी भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्यांपैकी होती. देशांतर्गत उड्डाणांव्यरितिरिक्त जेट एअरवेज इतरही देशांमध्ये विमानसेवा चालवायची. पण, कर्जाच्या प्रचंड ओझ्यामुळे 17 एप्रिल 2019 रोजी जेट एअरवेजचे कामकाज बंद पडले. तब्बल 30 वर्षांपूर्वी जेट एअरवेजच्या ताब्यात 120 विमाने होते, पण कंपनी बंद होताना संख्या केवळ 16 विमानांवर कमी झाली.

कधी श्रीमंतीचा रुबाब होता

कधी श्रीमंतीचा रुबाब होता

नरेश गोयल कधीकाळी भारतातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि उद्योग क्षेत्रात त्यांची ख्याती असायची. 1993 मध्ये नरेश गोयल यांनी जेट एअरवेजचा पाया घातला. आइल ऑफ मॅन-स्थित टेल विंड्स कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या बीज भांडवलातून त्यांनी जेट एअरवेज सुरू केली. त्यानंतर, 2005 च्या आयपीओनंतर फोर्ब्सच्या यादीत नरेश गोयल एकूण 1.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले.

कधी तिकीट एजंटचे करायचे काम

कधी तिकीट एजंटचे करायचे काम

70 च्या दशकात नरेश गोयल यांनी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॅशिअर म्हणून कामाला सुरुवात केली आणि नंतर एका एअरलाईन्स कंपनीत रुजू झाले. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी 1990 जेट एअरवेजची सुरुवात केली, पण या काळात एअरलाईन्स क्षेत्रात केवळ एअर इंडियाचा दबदबा होता. अशा परिस्थितीत, नरेश गोयल यांनी जेट एअरवेजच्या रूपात लोकांना हवाई प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला. 5 मे 1993 रोजी जेट एअरवेजच्या पहिल्या विमानाने उड्डाण केले.

वडीलांच्या मृत्यूनंतर जबाबदारी सांभाळली

वडीलांच्या मृत्यूनंतर जबाबदारी सांभाळली

नरेश गोयल यांचा जन्म पंजाबच्या संगरूर येथे एका सराफाच्या घरी झाला. गोयल यांच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले आणि नंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्या घराचा लिलाव करावा लागला. अशाप्रकारे गोयल यांनी कमी वयातच त्यांनी घराची जबाबदारी घेतली आणि 300 रुपये पगारावर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी करू लागले. या दरम्यान, अनेक परदेशी विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि व्यावसायिक कामासाठी परदेशात प्रवास करण्यास सुरुवात केली.

ट्रॅव्हल एजन्सीमधून आयुष्याला कलाटणी

ट्रॅव्हल एजन्सीमधून आयुष्याला कलाटणी

1969 मध्ये इराकी एअरवेजने जनसंपर्क अधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती केली आणि पुढे जाऊन एअरलाइनचे व्यवस्थापक बनले. इथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि या काळात व्यवसायातील अनेक बारकावे शिकले. 1974 मध्ये काही पैसे कर्ज घेऊन स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी, जेट एअर, सुरू केली. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने ‘ओपन स्काईज पॉलिसी’ला मंजुरी दिल्यावर गोयल यांनी एअर टॅक्सी सुरू केल्या.

2019 मध्ये उड्डाणे एअरवेजची उड्डाणे जमिनीवर

2019 मध्ये उड्डाणे एअरवेजची उड्डाणे जमिनीवर

एअरलाईन कंपनीवरील आर्थिक भार इतका वाढला होता की 2019 मध्ये जेट एअरवेजचे कामकाज पूर्णपणे ठेवले गेले. एअरलाईन्सवर 8500 कोटींचे कर्ज झाले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या Ethihad कडे जेट एअरवेजचा 24 टक्के हिस्सा होता, पण त्यांनीही संकटात गोयल यांना साथ दिली नाही. त्यांनतर गोयल यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली गेली आणि कॅनरा बँकेने नरेश गोयल यांच्यासोबत पत्नी अनिता गोयल यांनाही आरोपी धरले.