Headlines

Jasmin Bhasin : CRP लेव्हल वाढली, वाढदिवशीच गंभीर आजाराचं निदान; जास्मिन भसीननं सांगितला प्रसंग, म्हणाली, ‘वारंवार आजारी पडत होते’


Jasmin Bhasin : टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे.

Jasmin Bhasin Diagnosed With Terminal Ileitis On Her Birthday
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – जास्मिन भसीननं २८ जून रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी जास्मिन तिचा बॉयफ्रेंड अली गोनीसोबत दुबईला गेली होती. मात्र, अभिनेत्रीची तब्येत खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. याबद्दल अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली. जास्मिनला ‘टर्मिनल इलियटिस’ (terminal ileitis) या आजाराचं निदान झालं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या आजाराबद्दल बोलताना जास्मिननं सांगितलं की, सुरुवातीला लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली. दुबईत पोहोचल्यापासूनच तिला बरं वाटत नव्हतं, असं जास्मिननं सांगितलं.

जास्मिन भसीननं सांगितला प्रसंग

जास्मिन भसीननं सांगितलं की, तिची प्रकृती सतत खालावत असल्यामुळे तिनं आपला वाढदिवस हॉटेलच्या खोलीतच साजरा केला. जास्मिन म्हणाली, ‘मी रुग्णालयात पोहोचले आणि माझी तपासणी होईपर्यंत, माझी सीआरपी लेव्हल एका अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली होती. सीआरपी लेव्हल ० ते ५ च्या दरम्यान असायला पाहिजे. पण, माझी सीआरपी लेव्हल जवळपास ३२३ होती. संपूर्ण तपासणी पुन्हा करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलेलं. मला टर्मिनल इलियटिस नावाचा एक गंभीर आजार असून हा खूप गंभीर आजार आहे, असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं.’ जास्मिन पुढे म्हणाली की, यामुळे तुमच्या आतड्याच्या एका भागात सूज येते आणि त्यामागची अनेक कारणं असू शकतात.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘आता, देवाच्या कृपेनं मी बरी आहे. गेल्या दीड महिन्यात मी वारंवार आजारी पडत होते. आता तर मला ‘हो, मला बरं वाटतंय’ असं म्हणायलाही भीती वाटते… गेल्या काही महिन्यांत मी खूप कठीण काळातून गेले आहे. माझा काळ खूप धावपळीचा होता.’ असं जास्मिननं शेवटी सांगितलं. ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जास्मिन भसीन बोलत होती.
Maharashtra TimesApara Mehta : ‘तू माझ्या आयुष्यातील कुरूप स्त्री’, लग्नाच्या वाढदिवशीच पतीकडून अपमान; २० वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहतेय अभिनेत्री

टर्मिनल इलियटिस आजाराबद्दल…

टर्मिनल इलियटिस हा आजार लहान आतड्याच्या शेवटच्या भागावर परिणाम करतो. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, यामुळे सामान्यतः पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना होतात. या आजारामुळे आतड्यांनाही त्रास होतो.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा