Japan Amphibious Bus: जपानमधील अॅम्फिबिअस बस सध्या खुपच चर्चेत आहे. कारण ही बस रस्त्यावर धावतेच पण सोबतच बोटीसारखी पाण्यावर देखील धावते. या अनोख्या बसचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल.

अशी दिसते पाण्यावर चालणारी बस
हा व्हिडीओ daily_japan_with_pooja या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या या बसला अॅम्फिबिअस बस म्हणतात. म्हणजे ही बस रस्त्यावर सामान्य गाडीप्रमाणे चालते आणि पाण्यात गेल्यानंतर बोटीसारखी तरंगते. या वाहनाचा खालचा भाग बोटीच्या आकाराचा असल्यामुळे ते पाण्यात बुडत नाही. शिवाय, या वाहनामध्ये एक रडर असतं, ज्यामुळे पाण्यात त्याची दिशा नियंत्रित करण्यास मदत होते. जपानमध्ये अशा बसचा वापर प्रामुख्याने पर्यटनासाठी केला जातो. या अनोख्या बसमुळे प्रवाशांना रस्त्यावरून थेट पाण्यात जाण्याचा आणि बोटीसारखा प्रवास करण्याचा वेगळाच अनुभव मिळतो.
ही बस भारतामध्ये कधी येणार?
हा व्हिडीओ आतापर्यंत ५ लाख ३६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. अशा प्रकारची बस भारतामध्ये कधी येईल? असा प्रश्न देखील काही नेटकरी करत आहेत. असो, तुम्हाला ही बस कशी वाटली? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

