Headlines

Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Against Suspension Action; लाचखोर तहसीलदार प्रकरणात मोठी घडामोड, विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?


Tehsildar Vijay Chavan Suspended : जालना जिल्ह्यातील अंबडमधील लाचखोर प्रकरणात अडकलेले तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Tehsildar Vijay Chavan Suspended
तहसीलदार विजय चव्हाण निलंबन कारवाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तडजोडीनंतर 6 लाख 40 हजार रुपये स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथे एसीबीच्या पथकाने त्यांना जेरबंद केलं होतं.

महसूल विभागात खळबळ

या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विजय चव्हाण यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. तक्रारदाराकडून लाचेची मागणी झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात विजय चव्हाण यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपात अटक झाल्यानं महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra TimesST Bus Revenue : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एसटी महामंडळाने कमावला बक्कळ पैसा; राज्यात पुणे नंबर वन, किती कोटींची कमाई?

लाचखोरीविरोधातील ही कारवाई प्रशासनासाठी मोठा धक्का मानली जात असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. तहसीलदार चव्हाण 48 तासांवर पोलीस कोठडीत होते. नियमानुसार अशा लाचखोर अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश विभागीय आयुक्तांमार्फत जारी करण्यात येतात. त्यानुसार विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सदर निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

न्यायालयीन कोठडी मंजूर

या आदेशात म्हटलं आहे की, ‘विजय लक्ष्मण चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे सातारा जि. छत्रपती संभाजीनगर (शहर) येथे गु. र. क्र. 311/2026 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस 7 जून रोजी 12:25 वाजता अटक करून रिमांड यादीसह न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 9 जून 2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर 9 जून रोजी विशेष सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे आरोपी लोकसेवक विजय चव्हाण यांना हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे’, असा अहवाल जिल्हाधिकारी जालना यांनी सादर केला आहे.
Maharashtra TimesMumbai Crime : AC लोकलमधून तोतया RPF कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास, टीसी साळुंखे-कदम मॅडमना संशय, खडसावताच फेफे उडाली, घडाघडा सत्य सांगितलं
सदर आरोपी अधिकारी हे 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत असल्यानं त्यांना शासन सेवेतून निलंबित करणं आवश्यक आहे. अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचा पोलीस अभिरक्षेतील कालावधी हा 48 तास किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 (2) (अ) नुसार सदर अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यासाठी विभागीय आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आलं आहे.

पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित

दरम्यान, विजय लक्ष्मण चव्हाण, तहसीलदार अंबड (जि. जालना) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 4(2) (अ) मधील तरतुदीनुसार अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच 7 जून 2026 रोजी पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असून, पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील. तसेच निलंबन कालावधीमध्ये विजय चव्हाण तहसीलदार अंबड हे जिल्हाधिकारी जालना यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडून इतर कोठेही जाऊ शकत नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा