Headlines

jalgaon jamner youth catches leopard alive after fight; बिबट्याशी थेट दोन हात! जळगावच्या तरुणाने जिवाची पर्वा न करता जिवंत बिबट्या पकडला; पंचक्रोशीत धाडसाची चर्चा


Jamner Leopard Attack: बिबट्याचे नाव ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र जळगावच्या एका तरुणाने थेट बिबट्याशी झुंज देत त्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची एक घटना समोर आली आहे. या धाडसी घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

jalgaon-jamner-youth-catches-leopard-alive-after-fight
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव: खरंतर बिबट्या हे जरी नाव काढले तरी अंगावर शहारा येतो, आणि अनेकांना भीती निर्माण होते. पण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका तरुणाने बिबट्याला चक्क जिवंत पकडून दिला आहे. ते सुद्धा स्वतः एकट्याने त्याच्याशी झुंज दिली. फॉरेस्टचे कर्मचारी येईपर्यंत त्याने बिबट्याशी झुंज दिली आणि जिवंत त्याला पकडून दिले असल्याची ही थरारक घटना घडली आहे. ज्यामुळे सर्वत्र यात घटनेची चर्चा सुरु आहे.

मंत्री गिरीश महाजनांनी घेतली दखल

नेहमीच आपण प्रसिद्धी माध्यमातून बिबट्याच्या आणि वाघाच्या बातम्या वाचत असतो, बघत असतो. बिबट्यांमुळे, वाघामुळे अनेक चिमुकल्यांसह नागरिकांचा जनावरांचा जीव देखील गेला आहे, मात्र यामुळे ग्रामीण भागात बिबट्याची चांगली दहशत निर्माण झाली आहे. आजही अशी स्थिती कायम असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका तरुणाने वन विभागाला चक्क जिवंत बिबट्या पकडून दिला आहे. सध्या या तरुणाची संपूर्ण पंचकोशीमध्ये जोरदार चर्चा सुरू असून मंत्री गिरीश महाजन यांनीही या तरुणाची दखल घेतली आहे.

झुंज देताना मुकेश जखमी

जळगावच्या जामनेर तालुक्यात शहापूर गावात तरुणाने हल्ला करणाऱ्या बिबट्यासोबत झुंज देत त्याला जिवंत पकडण्याची थरारक घटना समोर आली आहे. मुकेश नाना डोंगरे असे धाडसी तरुणाचे नाव असून तो शहापूर येथील रहिवासी आहे. बिबट्यासोबत दोन हात करताना तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून तरुणाचे धाडसाबद्दल आणि हिमतीचे कौतुक केले आहे, तरुणाच्या दाखवलेल्या धाडसाची आणि बिबट्यासोबतच्या थरारक झुंज दिल्याची जळगावच्या जामनेर तालुक्यात सह जिल्ह्यात एकच चर्चा रंगू लागली आहे.

वनकर्मचारी येईपर्यंत पकडून ठेवलं

शेतात बिबट्या असल्याची माहिती त्या तरुणाला मिळाली शहापूर- टाकरखेडा रोडवरील शेतात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर याच दरम्यान बिबट्याने तरुणावर हल्ला केला. यात तरुणाने बिबट्यासोबत झुंज दिली. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत बिबट्याला पकडून ठेवलं व विभागाचे कर्मचारी आल्यानंतर तरुण आणि बिबट्याला त्यांच्या स्वाधीन केलं. या बिबट्याचे चारही पाय बांधून वनविभागाचे अधिकारी त्याला पिकप ट्रक मधून शेतातून घेऊन गेले.

एप्रिल महिन्यामध्ये नुकताच मुक्ताईनगर मधील बसस्थानक व शासकीय विश्रामगृहात परिसरात बिबट्या शिरला होता. तीन तासाच्या थरारानंतर वन विभागाने बंद केलं. यावेळेस आमदार चंद्रकांत पाटील देखील घटनास्थळी होते. अनेक अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वन विभागाने जुलबंद केले होते मात्र आज अशी एक घटना घडली असून या घटनेची पूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा