Headlines

Jalgaon Amalner Three Children Drown While Taking Selfie; सेल्फीचा मोह जिवावर बेतला, एकाचा पाय घसरला, त्याला वाचवताना दोघंही पाण्यात पडले; तिघं अल्पवयीन मुलांचा करुण अंत


Amalner Three Children Drown and Death : अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.

Amalner Three Children Drown and Death
अमळनेर सेल्फी घेताना मुलांचा बुडून मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा.प्रतिनिधी, जळगाव (अमळनेर) : सेल्फी घेताना पाय घसरल्यानं एकजण बुडू लागल्याने त्याला वाचवताना इतर दोन मुलांचाही मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) व दिनेश विजय पंजवानी (वय 17, तिघं रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) अशी मृत मुलांची नावं आहेत.

सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला

हे तिघं काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता खाण परिसरात गेले होते. तेथे बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्यावर चढले. सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने त्याचा हात धरला; मात्र, तोही खाली जाऊ लागला, म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला. मात्र, तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल करून पोलिसांना माहिती दिली.
Maharashtra TimesMumbai Crime : कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे
स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांच्यासह इतर घटनास्थळी पोहचले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दिनेश हा अकरावी कॉमर्सला, तर मानव आणि कार्तिक नववीत शिकत होते. घटनेमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली होती.

ढगफुटी नव्हे मुसळधार

ढगांच्या भोवऱ्याने दिशा बदलल्याने हवामान विभागाने वर्तविलेली ढगफुटी टळली असली तरी इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्याला मंगळवारी अतिवृष्टीने झोडपून काढले. इगतपुरीत २४ तासांत २०० मिमी, सुरगाण्यात १४९ तर त्र्यंबकेश्वरमध्ये २४ तासांमध्ये १२९.४ मिमी पावसाची नोंद झाली. हंगामातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
Maharashtra TimesPune Traffic: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद, कोणत्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी?

पर्यटन स्थळांवर जाण्यास १३ जुलैपर्यंत बंदी

शहरात मागील २४ तासांत ८४ मिमी, तर मंगळवारी दिवसभरात २३.७ मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर कायम असल्याने आज, बुधवारीदेखील पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनिवासी शाळांमधील सातवीपर्यंतच्या वर्गांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्व पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास १३ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संततधारेमुळे गोदावरीसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रामकुंड परिसरातील काही लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री १ हजार ६१४ क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी २१ हजार ९६५ क्युसेक करण्यात आला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा