Headlines

Jaipur Dating App Scam Gang busted robbery blackmailing two arrested Crime News; समलिंगी डेटिंग ॲपवर मैत्री, निर्जन जागी भेटायला बोलवायचे, कुणी नसल्याचं पाहून डाव साधायचे, दोघांना अटक


जयपूर : आधी ‘गे डेटिंग ॲप’वर मैत्री करायचे, मग समोरच्या व्यक्तीला भेटायला बोलावायचे. जेव्हा कुठलीच कल्पना नसलेली ती व्यक्ती ठरलेल्या जागी पोहोचायची, तेव्हा एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना मारहाण केली जायची, त्यांच्याकडील वस्तू लुटून त्यानंतर ब्लॅकमेल केले जायचे, असे प्रकार समोर आले होते. अखेर राजस्थानमधील जयपूर पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

जयपूरमधील एक टोळी ‘गे डेटिंग ॲप’द्वारे लोकांशी मैत्री करुन त्यांना भेटायला बोलवण्यास प्रवृत्त करत असे. समलिंगी संबंधांच्या उद्देशाने एखादी व्यक्ती तिथे पोहोचली की, ही टोळी त्यांना लक्ष्य करायची. ही टोळी पीडितांना मारहाण करायची आणि ब्लॅकमेल करुन पैसे उकळायची.

गे डेटिंग ॲपवर मैत्री

या प्रकरणी करधनी पोलीस ठाण्याने आता दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप’द्वारे तरुणांना टार्गेट केले जात असल्याच्या तक्रारी त्यांना मिळत होत्या. टोळीचे मेंबर गे डेटिंग ॲपवर तरुणांशी संपर्क साधायचे आणि जवळीक साधल्यानंतर त्यांना गर्दीपासून दूर असलेल्या निर्जन ठिकाणी भेटायला बोलावायचे.

Maharashtra TimesMumbai News : भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरुन नवविवाहिता पडली, पण झाडावर अडकून बचावली; मांडीत फांदी घुसली, फायर ब्रिगेडने कौशल्याने उतरवलं

मारहाण करुन ब्लॅकमेलिंग

तिथे पोहोचताच परिस्थिती पूर्णपणे बदलायची; पीडिताला मारहाण केली जायची आणि नंतर पैशांसाठी ब्लॅकमेल केले जायचे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर जयपूर पश्चिम पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि तपास करण्यासाठी एक टीम स्थापन केली.

त्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहिती आणि आपल्या गुप्तचर यंत्रणेचा वापर करुन त्यांनी या नेटवर्कशी संबंधित असू शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra TimesDelhi Crime : 21 वर्षीय मॉडेलला राहत्या घरी संपवलं, पोलीस जिम ट्रेनरच्या मागावर, बहिणीच्या फोनमुळे थरारक उलगडा

दोघा आरोपींना अटक

तपास जसजसा पुढे सरकला, तसतशी पोलिसांना दोन संशयितांबद्दल माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे करधनी पोलिसांनी अनिल रुलानिया आणि मदन नेहरा यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली.

चौकशीदरम्यान, या दोन आरोपींनी आतापर्यंत किती तरुणांना लक्ष्य केले आहे, हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच, या घटना केवळ जयपूरपुरत्या मर्यादित होत्या की हे नेटवर्क इतर शहरांमध्येही सक्रिय होते, याचाही तपास केला जात आहे.

या दोघांव्यतिरिक्त या टोळीत आणखी कोणी सामील आहे का? आरोपींच्या चौकशीतून इतर गुन्हे आणि संभाव्य साथीदारांबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल, अशी पोलिसांना आशा आहे. सध्या करधनी पोलीस या संपूर्ण नेटवर्कची माहिती एकत्र करण्याचे काम करत आहेत.

Maharashtra TimesRajkumar Jaat : कपडे काढले, 51 किमी चालत राहिला, 23 वर्षीय UPSC उमेदवाराची बॉडी सापडली, कुटुंबीयांचे गंभीर आरोप‘गे डेटिंग ॲप’वरून सुरू झालेल्या मैत्रीमागे किती गुन्हे दडलेले आहेत आणि या नेटवर्कमध्ये नेमके किती सदस्य आहेत, हे उघड करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे प्रकरण केवळ या दोघांच्या अटकेवरच संपत नाही; पोलिसांच्या पुढील चौकशीतून जयपूरमधील या ‘डेटिंग ॲप गँग’चे आणखी पैलू उघड होऊ शकतात.