जर तुमच्याही ITR रिफंडमधील रक्कम कापणात आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण कापण्यात आलेली रक्कम ही तुमची थकबाकी आहे. जर तुमची आधीची थकबाकी शिल्लक असेल तर ती यंदाच्या ITR रिफंडमधून वसूलन्यात आली आहे, त्यामुळे कापण्यात आलेली रक्कम ही तीच रक्कम आहे जी तुम्हाला कधीना कधी तरी भरावीच लागणार होती. तरी खबरदारी म्हणून प्रत्येक करदात्याने त्यांच्या थकबाकीविषयी जाणून घेतले पाहिजे. तांत्रिक समस्येमुळे होणाऱ्या नफ्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक करदात्याने आपल्या थकबाकीचा तपशील तपासला पाहिजे.
जुन्या थकबाकीचे तपशील कसे तपासतात?
- इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
- पेंडिंग ऍक्शन्स किंवा Response To Outstanding Demand वर क्लिक करा.
- तुमच्या थकबाकीचा संपूर्ण तपशील तुमच्यासमोर येईल.
Outstanding Demand म्हणजे काय?
Outstanding Demand म्हणजे तुमची थकबाकी. जेव्हा करदात्याचा जुना कर अद्याप भरला गेला नसतो तेव्हा त्या रक्कमेला Outstanding Demand म्हणतात. देशातील बहुतेक करदात्यांचा ITR Refund कापून येण्याचे कारण आऊटस्टँडिंग डिमांड आहे. एकंदरीत, जर रिफंड 10,000 रुपये असला आणि हातात रक्कम 8,000 रुपये आली असेल तर वजा करण्यात आलेली 2000 रुपये रक्कम ही तुमची जुनी करथकबाकी म्हणजेच आऊटस्टँडिंग डिमांड आहे.
Gold-Silver Rate: सोन्याने पुन्हा वाढवली धडधड, चांदीही महागली; सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेजुन्या थकबाकीचा तपशील पाहणे गरजेचेच
अनेकदा आयकर विभाग ITR Refund तसेच आऊटस्टँडिंग डिमांडसंबंधित नोटीस पाठवतात. बहुतेक करदाते या नोटिशीला दुर्लक्षित करतात आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतात. आयकर विभागाने पाठवलेल्या या नोटिशीला उत्तर देणे गरजेचे असते. उत्तर देण्यासाठी करदात्यांनी इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर लॉगिन करावे. पेंडिंग ऍक्शन्समध्ये जाऊन Response To Outstanding Demand वर क्लिक करावे. तिथे असणाऱ्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करावी.

