पीनट बटर आणि ब्रेड हा झटपट तयार होणारा आणि ऊर्जा देणारा लोकप्रिय नाश्ता मानला जातो. योग्य प्रकारचा ब्रेड आणि नैसर्गिक पीनट बटर निवडल्यास हा नाश्ता शरीराला प्रोटीन, फायबर आणि निरोगी चरबी पुरवतो. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकते. विशेषतः होल व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेडसोबत घेतल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. मधुमेह असलेल्या लोकांसाठीही साखरविरहित पीनट बटर फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या पीनट बटर आणि ब्रेडच्या सेवनामागचे वैज्ञानिक फायदे, योग्य प्रमाण आणि कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहे.

नाश्त्याला पीनट बटर आणि ब्रेड खाणं चांगला पर्याय आहे का?
हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, जर तुम्ही योग्य निवड केली तर:
- फायदे : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रसिद्ध झलेल्या एका रिपोर्टनुसार, पीनट बटरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, गुड फॅट्स आणि फायबर असतात. जेव्हा तुम्ही हे ब्रेडसोबत खाता, तेव्हा शरीराला कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचे उत्तम मिश्रण मिळते, ज्यामुळे दुपारपर्यंत वारंवार भूक लागत नाही आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
- महत्त्वाची अट : जर तुम्ही हा नाश्ता मैद्याच्या पांढऱ्या ब्रेडसोबत (White Bread) खात असाल, तर तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. पांढऱ्या ब्रेडमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि भूक लवकर लागते. त्यामुळे नेहमी ‘होल व्हीट ब्रेड’ (Whole Wheat) किंवा ‘मल्टीग्रेन ब्रेड’ चाच वापर करावा. तसेच, पीनट बटर घेताना त्यात अतिरिक्त साखर वा हायड्रोजनेटेड ऑइल (Hydrogenated Oil) नसावे.
पीनट बटर डायबिटीजच्या (मधुमेह) लोकांनी खाणं सेफ आहे का?
होय, डायबिटीजच्या रुग्णांसाठी पीनट बटर खाणे पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
- लो ग्लायसेमिक इंडेक्स (Low GI) : नॅशनल पीनट बोर्डच्या माहितीनुसार, पीनट बटरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, म्हणजेच ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
- मॅग्नेशियमचा साठा : शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ‘अमेरिकन डायबिटिज असोसिएशन’ च्या विविध संशोधनांनुसार, मॅग्नेशियम शरीरातील पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे शुगर नियंत्रित राहते.
- सावधानता : डायबिटिक रुग्णांनी बाजारातील ‘फ्लेवर्ड’ किंवा ‘चॉकलेट’ पीनट बटर घेऊ नये. त्यांनी लेबल वाचून फक्त १००% नॅचरल पीनट बटर (ज्यात फक्त शेंगदाणे आणि थोडे मीठ असते) निवडावे.
कोणत्या लोकांनी पीनट बटर खाणं टाळावं?
काही विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांनी पीनट बटर खाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे:
- शेंगदाण्याची ॲलर्जी (Peanut Allergy) : ज्या लोकांना शेंगदाण्यांची ॲलर्जी आहे, त्यांनी हे चुकूनही खाऊ नये. यामुळे अंगावर पित्त उठणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
- किडनी स्टोन (खडे) का त्रास : नॅशनल किडनी फाउंडेशनच्या माहितीनुसार, पीनट बटरमध्ये ‘ऑक्सलेट’ (Oxalates) चे प्रमाण जास्त असते. ज्यांना वारंवार किडनी स्टोन होतो, त्यांनी याचे अतिसेवन टाळावे.
- फॅटी लिव्हर किंवा तीव्र ॲसिडिटी : यात फॅट्स आणि कॅलरीज खूप जास्त असतात. त्यामुळे ज्यांचे यकृत कमकुवत आहे किंवा ज्यांना जड अन्न पचत नाही, त्यांना हे खाल्ल्यास पित्त किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.
- यूरिक ॲसिड वाढलेले असणे : यूरिक ॲसिडची समस्या असलेल्यांनी याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
पीनट बटर खाण्याची योग्य वेळ
- सकाळी नाश्त्याला : सकाळी मेटाबॉलिझम वेगवान असते आणि शरीराला दिवसभरासाठी ऊर्जेची गरज असते, त्यामुळे नाश्त्यात खाणे सर्वोत्तम.
- वर्कआउटच्या आधी/नंतर (Pre/Post Workout) : जे लोक जिम किंवा व्यायाम करतात, ते व्यायामाच्या १ तास आधी ऊर्जेसाठी किंवा व्यायामानंतर स्नायूंच्या दुरुस्तीसाठी (Muscle Recovery) हे खाऊ शकतात. रात्री झोपताना हे खाणे टाळावे, कारण ते पचण्यास जड असते.
पीनट बटर खाण्याची योग्य प्रमाण
एका सामान्य व्यक्तीसाठी दिवसाला १ ते २ चमचे (Tablespoons) पीनट बटर खाणे पुरेसे आहे. हे प्रमाण सुमारे ९० ते १८० कॅलरीज आणि ७ ते १४ ग्रॅम प्रोटीन देते. वजन कमी करायचे असल्यास १ चमचा पुरेसा आहे.
पीनट बटर खाण्याची योग्य पद्धत काय?
- मल्टीग्रेन टोस्ट किंवा ब्रेडवर पसरवून खाणे ही सर्वात सोपी पद्धत आहे.
- जर ब्रेड खायचा नसेल, तर सफरचंदाच्या फोडींवर (Apple Slices) किंवा केळ्यासोबत पीनट बटर लावून खाणे हा एक अत्यंत आरोग्यदायी आणि वजन नियंत्रित ठेवणारा पर्याय आहे.
- तुम्ही तुमच्या सकाळच्या ओट्सच्या (Oats Oatmeal) दलियामध्ये किंवा प्रोटीन स्मूदीमध्ये १ चमचा पीनट बटर मिक्स करू शकता.
पीनट बटर हे प्रथिनांचा एक स्वस्त आणि उत्तम स्त्रोत आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि मैदा विरहित ब्रेडसोबत याचे सेवन केले, तर ते तुमचे हृदय आणि स्नायू दोघांसाठी उत्तम टॉनिक ठरेल.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Jul 10, 2026, 01:56 PMMedically Reviewed byDr Vijay Negalur
- Jul 10, 2026, 01:56 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
