Headlines

iPhone खरेदीवर 35,000 चा थेट डिस्काउंट; आयफोन प्रेमींसाठी सुवर्णसंधी, iPhone 15 ते iPhone 17 वर एअरटेलची बंपर ऑफर। Maharashtra Times


तुम्ही एअरटेल युझर असाल आणि नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. एअरटेल आणि क्रमाने या बंपर ऑफरमध्ये iPhone 15, iPhone 16 आणि iPhone 17 सीरीजच्या निवडक हँडसेट्सवर 35 हजारांची बंपर सूट मिळत आहे. ग्राहकांनी या ऑफरचा लाभ डिजिटल पद्धतीने कसा घ्यावा, याची सोपी पद्धत बातमीत दिली आहे.

एअरटेल युजर्सना नवीन आयफोनच्या खरेदीवर तब्बल 35,000 रुपये वाचवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. या ऑफरची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये थेट स्टोअर डिस्काउंटसोबतच 12,000 रुपयांचा अतिरिक्त एक्स्चेंज बोनस देखील समाविष्ट आहे.

हा डिस्काउंट थेट आयफोन 15, आयफोन 16 आणि नुकत्याच चर्चेत आलेल्या आयफोन 17 सिरीजच्या निवडक प्रीमियम मॉडेल्सवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

35,000 च्या डिस्काउंटचे ‘टेक’ गणित

अनेक ग्राहकांना प्रश्न पडतोय की हा 35 हजार रुपयांचा डिस्काउंट थेट बिलिंगमध्ये कसा वजा होणार? तर हा एकूण डिस्काउंट दोन मुख्य भागांमध्ये विभागला गेला आहे.

1. थेट स्टोअर सवलत: एअरटेलचे प्रीमियम किंवा ठराविक पोस्टपेड प्लॅन्स वापरणाऱ्या ग्राहकांना क्रोमा स्टोअरवर आयफोन खरेदी करताना 23,000 रुपयांपर्यंतचा थेट इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.

2. फ्लॅट एक्स्चेंज बोनस: जर ग्राहक आपला जुना स्मार्टफोन देऊन नवीन आयफोन खरेदी करत असतील, तर जुन्या फोनच्या मूळ मूल्याव्यतिरिक्त क्रोमा आणि एअरटेलकडून 12,000 रुपयांचा फ्लॅट एक्स्चेंज बोनस दिला जात आहे.

12,000 चा एक्स्चेंज बोनस मिळवण्याचा नियम

क्रोमाच्या Trade-in पॉलिसीनुसार, जर तुमच्या जुन्या कार्यरत स्मार्टफोनचे मूल्य मूल्यांकन प्रक्रियेत 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठरले, तर तुम्हाला पूर्ण 12,000 रुपयांचा अतिरिक्त एक्स्चेंज बोनस मिळेल. जर जुन्या फोनची व्हॅल्यू 18,000 ते 29,999 रुपयांच्या दरम्यान असेल, तर हा एक्स्चेंज बोनस 8,000 रुपये मिळतो. यामुळे कमाल सवलत मिळवण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या आणि प्रीमियम कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे.

एअरटेल युजर्सनी हा बंपर ऑफर कसा क्लेम करावा?

Airtel Thanks ॲप: सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील अधिकृत ‘Airtel Thanks’ ॲप ओपन करा. तिथल्या ‘Exclusive Offers’ किंवा रिवॉर्ड्स सेक्शनमध्ये जा.

क्रोमा कूपन कोड: जर तुमचा एअरटेल नंबर या ऑफरसाठी पात्र असेल, तर तुम्हाला तिथे एक ‘Croma Discount Code’ दिसेल, तो जनरेट करून सेव्ह करा.

क्रोमा स्टोअरला भेट: हा कूपन कोड घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही ‘Croma’ डिजिटल स्टोअरला भेट द्या.

अंतिम बिलिंग: स्टोअरमध्ये आयफोन 15, 16 किंवा 17 सिरीज निवडल्यानंतर बिलिंग काउंटरवर हा कोड दाखवा. तिथे 23,000 रुपयांपर्यंतचा थेट डिस्काउंट आणि जुना फोन एक्स्चेंज केल्यास 12,000 रुपयांचा बोनस जोडून एकूण 35,000 रुपयांची बंपर बचत केली जाईल.

तुम्ही प्रीमियम 5G नेटवर्कवर शिफ्ट होण्यासाठी नवीन आयफोन घेण्याच्या तयारीत असाल, तर क्रोमा आणि एअरटेलची ही भागीदारी तुमच्या खिशाचा भार खूप कमी करणारी ठरेल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णी“शुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.”आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत