Headlines

INDIGO 20 Years Offer 20000 Free Flight Tickets ; इंडिगोच्या 20,000 प्रवाशांच्या खिशात तिकिटांचे पैसे येतील परत; 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ऑफर


इंडिगोने 20 वर्षांचा टप्पा गाठला आहे. इंडिगो एअरलाईनला सुरुवात होऊन 20 वर्षे झाली आहेत. या प्रसंगी इंडिगोच्या प्रवाशांची चांदी होणार आहे. जर तुम्ही इंडिगोचे नेहमीचे प्रवासी आहात आणि इंडिगोने जाहीर केलेल्या या विशेष ऑफरसबंधित अटी शर्तींना पात्र ठरत आहात तर चेहऱ्यावर नक्कीच मोठे हास्य असुद्यात कारण येत्या 3 ते 4 दिवसांत तुमच्या तिकिटांचे पैसे तुमच्या खात्यात रिफंड होणार आहेत. एकंदरीत, INDIGO च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील एकूण 20,000 प्रवाशांना मोफत विमान प्रवास मिळणार आहे.

INDIGO च्या या विशेष ऑफरसाठी अटीशर्ती

इंडिगोने नक्कीच 20 व्या वर्धापनादिनानिमित्त एक विशेष ऑफर जारी केली असली तरी ही विशेष ऑफर मिळवण्यासाठी प्रवाशांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. इंडिगो 20,000 प्रवाशांच्या तिकिटांची रक्कम प्रवाशांच्या खात्यात रिफंड करणार आहे. पण या ऑफरमध्ये त्याच प्रवाशांचा फायदा होणार आहे ज्यांनी देशांतर्गत प्रवास केला आहे. एकंदरीत, ही ऑफर फक्त देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच लागू आहे. त्याचबरोबर, प्रवाशाने 4 ऑगस्ट 2026 ते 6 ऑगस्ट 2026 या तारखांदरम्यानच प्रवास केलेला असावा. जर तुम्ही इंडिगो एअरलाईन्सचे नेहमीचे प्रवासी आहात आणि 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टदरम्यान तुम्ही प्रवास केला असाल किंवा करणार आहात तर निश्चिंत रहा, तुम्हालाही या विशेष ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळण्याची शक्यता अफाट आहे.

INDIGO च्या या विशेष ऑफरसाठी कसे करावे अर्ज?

INDIGO ने 20 वर्षांचा टप्पा गाठला आहे त्या आनंदात त्यांनी 20,000 प्रवाशांना मोफत देशांतर्गत प्रवास करण्याची मुभा दिली आहे. पण ही ऑफर ऐकून अनेकांना प्रश्न पडला असेल की ‘आम्हाला या ऑफरचा लाभ कसा घेता येईल?’ तर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 4 ऑगस्ट 2026 ते 6 ऑगस्ट 2026 या काळात इंडिगो एअरलाईन्सने देशांतर्गत प्रवास करणे बंधनकारक आहे तरच तुम्ही इंडिगोच्या त्या नशीबवान 20,000 प्रवाशांच्या यादीत स्थान मिळवू शकता.

ऑफर मिळवण्याची प्रक्रिया काय?

20 व्या वर्धापनदिनानिमित्त असणाऱ्या या विशेष ऑफरची संधी देण्यासाठी इंडिगो 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टदरम्यान देशांतर्गत प्रवासासाठी इंडिगोची निवड करणाऱ्या प्रवाशांची यादी तयार करेल. तसेच एका रँडम निवड प्रक्रियेद्वारे त्यातील काही प्रवाशांची निवड करून त्यांना ईमेल किंवा WhatsApp द्वारे एक सोप्पा प्रश्न विचारण्यात येईल. योग्य उत्तर देणाऱ्या प्रवाशाला इंडिगोकडून रिफंड मिळवण्याची संधी मिळेल.

Maharashtra TimesInheritance Rights: नॉमिनी प्रॉपर्टीचा मालक नाही! काय आहे कायदेशीर नियम? वाद न घालता मृत्युपत्राद्वारे मिळेल मालमत्तेचा वारसा! कसं पाहानिवड झालेल्या प्रवाशांना कधीपर्यंत मिळणार रिफंड?

जर तुम्हाला इंडिगोकडून ईमेल किंवा WhatsApp च्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला आणि तुम्ही त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. तर पुढच्या 3 ते 4 दिवसांत तुमच्या देशांतर्गत विमान प्रवास तिकिटाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. एक लक्षात असुद्या, इंडिगोकडून रिफंड करण्यात येणारी रक्कम जास्तीत जास्त10,000 रुपयांपर्यंतच असू शकते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत