Indias Top Order Fails Again Fans Troll Team Despite 189 Against England Memes Viral | संजू किशन तिलक पुन्हा फ्लॉप! ‘आता यांना घरी बसवा’, फॅन्स टीम इंडियाला करताहेत ट्रोल, IND vs ENG मॅचवर मीम्स व्हायरल
Indias Top Order Fails Again Fans Troll Team Despite 189 Against England Memes Viral | संजू किशन तिलक पुन्हा फ्लॉप! ‘आता यांना घरी बसवा’, फॅन्स टीम इंडियाला करताहेत ट्रोल, IND vs ENG मॅचवर मीम्स व्हायरल
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी डाव सावरत भारताची धावसंख्या १८९ पर्यंत पोहोचवली. पण सलामीवीरांच्या अपयशामुळे चाहते चांगलेच संतापले असून, भारतीय संघावर जोरदार टीका केली जात आहे.
(फोटो सौजन्य – criikcasam/Instagram)
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. मात्र, पहिलाच सामना एक डाव झाल्यानंतर पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. भारताने अवघ्या ६ धावांत २ विकेट गमावल्या. त्यामुळे संतप्त झालेले चाहते भारतीय संघाची फिरकी घेत आहेत. चला पाहूया, भारतीय फलंदाजांवर व्हायरल होणारे मीम्स.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १८९ धावा केल्या.
संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा एकदा अपयशी ठरले. संजू सॅमसन १ धावेवर बाद झाला, तर इशान किशनला खातेही उघडता आलं नाही.
वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे काही क्रिकेट चाहते नाराज असल्याचं दिसून येत आहे.
या सामन्यात भारताच्या मध्यफळीने दमदार फलंदाजी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
तिलक वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने १३ चेंडूत केवळ १३ धावा केल्या.
शिवम दुबेने २१ चेंडूत ४२ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यामुळे भारताची धावसंख्या १८९ पर्यंत पोहोचली.
भारताने १८९ धावा उभारल्या असल्या तरी, हा सामना झाला असता तर टीम इंडियाचा पराभव झाला असता, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा