कन्सल्ट जनरल ऑफ इंडिया इन न्यूयॉर्क कडून दिलीप कुमार बुंगटावुला या 26 वर्षीय तरुणाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. शिक्षणासाठी आणि करिअरसाठी तरुणाने अमेरिकेची वाट धरली पण अमेरिकेतील एका अपघातात दिलीपवर काळाने आघात केला आहे. अमेरिकेतील ओईहो राज्यात झालेल्या एका ट्रक अपघातात भारतीय तरुण दिलीप कुमार बुंगटावुला याचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी आहेत.
अमेरिकेतील ओईहो राज्यातील Interstate 480 येथे हा अपघात घडला. यावेळी दिलीप सेडान कार चालवत होता. अशामध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने सेंट्रल मेडियन ओलांडून थेट दिलीपच्या कारला धडक दिली. या अपघातात दिलीपचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील इतर जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात 7 ऑगस्ट 2026 रोजी झाला. अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून दिलीपच्या कुटुंबाची शक्यतेवढी मदत केली जात आहे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
आंध्रप्रदेश राज्यातून येणारा दिलीप कुमार बुंगटावुला एका शेतकरी कुटुंबातून येतो. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती मर्यादित आहे. आई वडिलांनी अनेक कष्ट घेऊन दिलीपच्या उज्वल भविष्यासाठी त्याला अमेरिकेला पाठवलं. नुकतेच, 2025 मध्ये दिलिपचे शिक्षण पूर्ण झाले आणि तो एका कंपनीत नोकरीलाही लागला. अमेरिकेच्या केंट स्टेट युनिव्हर्सिटीत त्याने शिक्षण घेतले. त्याने नुकतीच Master Of Science ही पदवी पूर्ण केली. सध्या तो अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता.
भारतात दिलीपच्या मृत्यूची बातमी येताच त्याचे कुटुंब कोलमडून पडले आहे. त्याच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करण्यास अमेरिकेतील भारतीय दूतावास तसेच नॉर्थ अमेरिका तेलगू सोसायटी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील नॉर्थ अमेरिका तेलगू सोसायटीने दिलीपच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून फंडरेजर सुरु केला आहे. संस्थेच्या या प्रयत्नांमुळे या कठीण काळात बुंगटावुला कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच न्यूयॉर्क येथे स्थित असणाऱ्या दूतावासाकडून दिलीपच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करण्यात आला आहे. ते सतत दिलीपच्या कुटुंबाच्या संपर्कात असून शक्य तितक्या मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
Iran News: ते खरंच सर्वोच्च नेते होते का? अंधाऱ्या कारमध्ये खामेनींची भेट; पण इराणच्या राष्ट्रपतींनाच शंकाअपघातात दगावलेल्या दिलीप कुमार बुंगटावुलाचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच्या पार्थिवारील अंत्यसंस्कार भारतातच करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतभरातून दिलीप कुमारच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला जात आहे.

