Headlines

Indian Stock Market m-cap; आशियाई बाजारात विक्रीचं तुफान! भारत पुन्हा टॉप 5 मध्ये; तैवान, कोरियन मार्केट कोसळले; नेमका विषय काय?


India Share Market Today: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे सतत विक्रमी उभारी घेणारे तैवान आणि दक्षिण कोरियाई शेअर बाजार जमिनीवर कोसळले आहेत. यासह भारताचा शेअर मार्केट पुन्हा जगातील पाचवा सर्वात मोठा इक्विटी बाजार बनला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या शेअर मार्केटच्या यादीत सातव्या स्थानावर घसरल्यानंतर उल्लेखनीय पुनरागमन करून भारताने मान पुन्हा मिळवला आहे.

भारताने या शर्यतीत तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या आशियाई बाजारांना मागे टाकले. देशांतर्गत बाजारात परकीय गुंतवणूकदारांचे कमबॅक, मजबूत आर्थिक पाया आणि बाजारावरील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे भारतीय बाजाराने पुन्हा एकदा आघाडी घेतली.
Maharashtra TimesGold Price Fall Today: सुवर्ण बाजाराचा ‘ट्रेंड’ बदलला! ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जागतिक घडामोडींचा देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांवर परिणाम

नफावसुलीमुळे आशियाई बाजाराला उतरती कळा

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यात प्रचंड खरेदी झाली पण, अलीकडच्या नफावसूलीमुळे तैवान व दक्षिण कोरियाई बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे झरझर खाली उताराला, ज्याचा थेट भारताला फायदा झाला. सध्या देशांतर्गत बाजाराचे एकूण एम-कॅप 5.05 ट्रिलियन डॉलर्स असून चहुबाजूने विक्रीचा फटका सहन करणाऱ्या तैवान आणि कोरियाई बाजाराचे एम-कॅप अनुक्रमे 4.97 ट्रिलियन डॉलर्स आणि 4.66 डॉलर्सवर कमी झाले. या घसरणीमुळे दोन्ही शेअर मार्केट 5 ट्रिलियन डॉलर्सच्या क्लबमधूनही बाहेर पडले.

जगातील सर्वात मोठा शेअर बाजार कोणता?
जागतिक बाजार भांडवलाच्या यादीत अमेरिका अजूनही अव्वल स्थानावर असून त्याखाली चीन, जपान आणि हाँगकाँग शेअर मार्केट आहेत. जून महिना अख्ख्या जागतिक शेअर मार्केटसाठी निराशाजनक ठरला पण, या मंदीच्या काळातही भारतीय शेअर बाजाराने चढता आलेख कायम ठेवला.
Maharashtra TimesUS Iran Tension: होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि गॅसवाहून नेणाऱ्या जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांवरील दबाव कमी झाला परिणामी, देशांतर्गत बाजारातील वातावरणही कमी झाले. जून महिन्यात देशांतर्गत बाजारातील एम-कॅप 2.75 टक्क्यांनी वाढले तरी, जगातील इतर प्रमुख बाजारांचा आलेख घसरतच राहिला.

त्याचवेळी, दक्षिण कोरिया आणि तैवानचे बाजार भांडवल अनुक्रमे 4.7% आणि 2.2% घटले तर, जगातील जगातील सर्वात मोठी बाजार असलेला अमेरिका आणि दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेला चीन, या दोन्ही बाजारांचे बाजार भांडवल महिनाभरात जवळपास स्थिर राहिले.

(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत