Headlines

Indian Share Market Returns Performance 2026 ; Explained : युद्धानंतर पाकिस्तानचा शेअर बाजारही सावरला पण भारतात अजूनही घसरण सुरूच, यामागची ४ कारणं


यंदा भारतीय शेअर बाजाराचा रंग लाल आणि दिशा खालच्या बाजूला झुकलेली जास्त दिसत आहे. 2026 वर्षाचे आकडे पाहिले तर यंदा भारतीय शेअर बाजाराने दिलेले रिटर्न्स नकारात्मक स्थितीत आहेत. अगदी या शर्यतीत पाकिस्तान भारताच्या बराच पुढे निघून गेला आहे. यंदा भारतीय शेअर बाजाराची स्थिति इतकी बिकट का? नेमकं काय आहे संपूर्ण कारण? जाणून घ्या.

Indian Share Market Performance Returns 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-इराण देशांमध्ये असणाऱ्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर होणार असा अंदाज बहुतेक गुंतवणूकदारांचा होता.परंतु या परिस्थितीतही जगातील बहुतेक शेअर बाजारांनी उत्तम रिटर्न्स दिले आहेत. अशात भारताची यंदाची स्थिती निराशाजनक आहे. शेअर बाजारांच्या या शर्यतीत पाकिस्तानने भारताला मागे सोडले आहे.

स्टँडर्ड अँड पुअर्सच्या आकडेवारीनुसार, भारताने 2026 वर्षात एकूण -6.94% रिटर्न्स दिले आहेत. यंदाच्या वर्षात भारत जगातील सगळ्यात कमी रिटर्न्स देणाऱ्या शेअर बाजारापैकी एक आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने यंदा 15.92% रिटर्न्स दिले आहेत.पूर्व आशियाई देशांची कामगिरी अतिशय उत्तम आहे. साऊथ कोरियातील शेअर बाजाराने 144.11% दराने रिटर्न्स दिले आहेत. तर जपानच्या शेअर बाजाराने यंदा 31.99% रिटर्न्स दिले आहेत. Taiwan च्या शेअर बाजारात परतव्याचा दर 84.88% नोंदवण्यात आला.

अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता असणाऱ्या देशांच्या शेअर बाजाराचा आढावा घेतला तर अमेरिकेच्या शेअर बाजाराचा यंदाचा परतावा दर 20.86% आहे. तर चीनने यंदाच्या वर्षी आतापर्यंत 6.91% रिटर्न्स दिले आहेत. अगदी युद्धजन्य परिस्थिति असणाऱ्या देशांमध्येही परतव्याचा दर ठीक ते चांगल्या श्रेणीत आहे.

मग भारतीय शेअर बाजारात इतकी मंदी का?

  • परदेशी गुंतवणुकीचे घसरते प्रमाण

जेव्हा शेअर्स खरेदी करण्यापेक्षा ते जास्त विकले जातात तेव्हा याचा परिणाम शेअर बाजारावर जाणवतो. भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीतही तेच झाले. या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारातून हात मागे सारले. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढवण्यापेक्षा केलेली आधीची गुंतवणूक मागे घेण्यास जास्त पसंती दिली, याचा परिणाम म्हणजे यंदाच्या वर्षी भारतीय शेअर बाजार जास्तकरून लाल रंगात दिसून आला. मार्च 2026 ते जून 2026 या चार महिन्यात एकूण 2.4 लाख रुपयांची परदेशी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारातून बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे जुलै 2026 आणि ऑगस्ट 2026 महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे. तरीही आताही यंदाच्या वर्षीचे FPI प्रमाण नकारात्मक स्थितीतच आहे. त्यामुळे, पुढील महिन्यांत परदेशी गुंतवणुकांची स्थिति कशी राहील? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

  • भारतीय रुपयांत झालेली घसरण

परदेशी गुंतवणूकदारांसाठी फक्त शेअर बाजाराची वाढच पुरेशी नसते,त्या देशाचे चलन किती घसरले या गोष्टीदेखील विचारात घेतल्या जातात. यंदा भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेने 6% दराने कमजोर झाला. याचा मोठा परिणाम भारतातील परदेशी गुंतवणुकीवर दिसून येत आहे.

  • भारतात शेअर्सचे बाजारमूल्य महाग

भारतात शेअर्सचे बाजारमूल्य इतर देशांतील शेअर्सच्या मूल्यांच्या तुलनेने अधिक महाग असल्याचे दावे परदेशातील गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. इतर देशांतून मिळणारा नफा आणि भारताच्या तुलेनेने कमी किंमती या गोष्टींमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे भारताकडून इतर देशांकडे वळवले आहे.

  • शेअर बाजारात महत्वाचा ठरला एआई फॅक्टर

यंदाच्या वर्षी ज्या देशातील शेअर बाजारांनी उत्तम कामगिरी केली. त्या शेअर बाजारातील कंपन्यांमधील एआई फॅक्टर महत्वाचा ठरला. परदेशी गुंतवणूकदरांनी भारतीय शेअर बाजारला पाठ दाखवली याचे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे भारतातील लिमिटेड AI Exposure. एआईच्या वाढत्या मागणीचा थेट फायदा साऊथ कोरियाच्या kospi शेअर बाजाराला तसेच Taiwan च्या शेअर बाजाराला झाला.

Maharashtra TimesGold Silver Duty Cut: सरकार सोनं चांदी स्वस्त करणार? एका निर्णयामुळे झटक्यात दर कमी होणार; सणासुदीला खरेदीची सुवर्ण संधी मिळणारमग पाकिस्तानच्या शेअर बाजाराने असे अनोखे काय केले?

पाकिस्तानच्या शेअर बाजारातून मिळालेल्या उत्तम रिटर्न्सकडे वाढीपेक्षा रिकव्हरीच्या दृष्टिकोणाने पाहिले पाहिजे. आधी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति गंभीर होती. परंतु, आयएमएफ प्रोग्राम अंतर्गत त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधार होऊ लागला. महागाई तसेच व्याजदरात घट दिसून येऊ लागली. या सर्व सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. परिणामी, पाकिस्तानच्या शेअर बाजाराने यंदा भारतीय शेअर बाजारपेक्षा उत्तम रिटर्न्स दिले.