Indian Man Stabbed In US Mall: अमेरिकेतील युटा येथील ‘व्हॅली फेअर मॉल’मध्ये एका भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर धार्मिक द्वेषातून चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना वेस्ट व्हॅली सिटी येथील ‘व्हॅली फेअर मॉल’मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लार्सनने मॉलमध्ये काम करणाऱ्या सोहेल नावाच्या भारतीय तरुणाशी संवाद साधून आधी त्याचा धर्म विचारला आणि नंतर अचानक हल्ला केला. पोलिसांनी लार्सनवर खुनाचा प्रयत्न आणि धोकादायक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करून त्याला सॉल्ट लेक काउंटी कारागृहात पाठवले आहे.
लार्सनने आधी सोहेलला त्याच्या मूळ देशाबद्दल विचारले. सोहेलने ‘मी भारताचा असून माझे नाव सोहेल आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने ‘तू मुस्लिम आहेस का’ असे विचारले आणि सोहेलने होकार देताच लार्सनने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली, अशी माहिती मॉलच्या शेजारील दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या लुना नुनेझ यांनी दिली.
UK Social Media Curfew: ब्रिटनमध्ये मुलांसाठी रात्री सोशल मीडिया बंद; आपोआप सुरु होणारे Video फिचर्स बंद होणार
द्वेषाला जागा नाही
सोहेल हा कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष असून त्याला पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. सोहेलचे व्यवस्थापक अदनान मोहम्मद यांनी या हल्ल्याचा निषेध करून म्हटले, ‘हा सरळ धार्मिक द्वेषयुक्त गुन्हा आहे. सोहेल अत्यंत कष्टाळू माणूस आहे. अशा निष्पाप व्यक्तीवरील हल्ला हा त्याच्या संपूर्ण कुटुंबावरील हल्ला ठरतो.’ दरम्यान अमेरिकेतील नागरी हक्क संघटनांनी या निमित्ताने देशातील वाढत्या मुस्लिमविरोधी घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
Bangkok Pub Fire: जीव वाचवण्यासाठी किचन-बाथरूममध्ये लपले, आगीत होरपळून २७ जणांचा मृत्यू; बँकॉकच्या पबमध्ये भीषण दुर्घटना
पलायनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर गोळीबार
कलबुर्गी : येथील मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या तीन कैद्यांपैकी एकाला, संतोष याला पोलिसांनी शोधून काढले. अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हल्ला केला, ज्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. या झटापटीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले. हे तीन कैदी मंगळवारी पहाटे बाथरूमचे ग्रिल कापून शिडीच्या साह्याने पळून गेले होते. या हलगर्जीपणाबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे

