India vs Australia women harmanpreet win toss playing 11 Kranti goud; सेमीफायनलसाठी निर्णायक लढत; भारताने टॉस जिंकत फलंदाजी निवडली, टीममध्ये एक मोठा बदल
India vs Australia women harmanpreet win toss playing 11 Kranti goud; सेमीफायनलसाठी निर्णायक लढत; भारताने टॉस जिंकत फलंदाजी निवडली, टीममध्ये एक मोठा बदल
IND W vs AUS W Toss : महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करो वा मरोच्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी हरमनप्रीतने संघात एक बदल केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील करो वा मरोच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे टॉसनंतर हरमनप्रीतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता चित्र स्पष्ट झाले आहे, भारत आता फलंदाजी करणार आहे.
भारताच्या संघात एक बदल
या सामन्यासाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नंदिनी शर्माच्या जागी वेगवान गोलंदाज क्रांती गौडचे पुनरागमन झाले आहे. टॉसनंतर हरमनप्रीत कौरने या बदलाची माहिती दिली. ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध अतिरिक्त वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलिया ताकद लावणार
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. महिला टी-२० विश्वचषकात गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मात्र या स्पर्धेत त्यांना मागील काही वर्षांत मोजकेच पराभव स्वीकारावे लागले असून, त्यातील दोन पराभव भारताकडून झाले आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतासाठी हा केवळ साखळी फेरीतील सामना नाही, तर उपांत्य फेरीचे भवितव्य ठरवणारी लढत आहे. विजय मिळाल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर पराभव झाल्यास विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे लॉर्ड्सवरील या सामन्याकडे भारतीयांचे लक्ष लागलेले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा