ind vs ire shreyas iyer wins toss reveals why vaibhav sooryavanshi is still waiting for t20 debut; भारतानं टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय; संजू-अभिषेक ओपनिंगला, वैभवला संधी नाहीच, कॅप्टन अय्यर म्हणाला…
ind vs ire shreyas iyer wins toss reveals why vaibhav sooryavanshi is still waiting for t20 debut; भारतानं टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय; संजू-अभिषेक ओपनिंगला, वैभवला संधी नाहीच, कॅप्टन अय्यर म्हणाला…
India vs Ireland T-20, India Wins Toss: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे. पण मात्र वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागली आहे. त्याला का संधी दिली नाही? नेमकं कारण काय? अय्यर काय म्हणाला?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टी-२० विश्वचषक विजयानंतर भारतीय संघ नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नव्या कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर बोलताना अय्यर म्हणाला, “या मैदानावर आमच्यापैकी अनेक जण प्रथमच खेळत आहेत. त्यामुळे खेळपट्टी कशी वागेल, याचा अंदाज नाही. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.” या सामन्यापूर्वी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची जोरदार चर्चा होती. मात्र चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. वैभवला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. याबाबत अय्यर म्हणाला, “गेल्या काही काळात सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंनाच आम्ही संधी दिली आहे. वैभवचीही वेळ येईल आणि योग्य संधी मिळाल्यावर त्याला पदार्पणाची संधी दिली जाईल.”
तीन वेगवान गोलंदाज आणि एक ऑलराउंडर
मार्च महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. मात्र त्यानंतर बीसीसीआय आणि निवड समितीने मोठा निर्णय घेत श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाची धुरा सोपवली. २०२८ ऑलिम्पिक आणि २०२८ च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करून भविष्यासाठी सक्षम संघ उभारण्याच्या दृष्टीने अय्यरवर विश्वास दाखवण्यात आला आहे. संघरचनेबाबत माहिती देताना अय्यरने सांगितले की, भारत या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूसह उतरला आहे.
संजू-अभिषेकवर पुन्हा विश्वास
सलामीच्या जोडीवरही संघ व्यवस्थापनाने कायम विश्वास दाखवला आहे. टी-२० विश्वचषक विजेते सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनाच पुन्हा डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
टीम टेक्टर, रॉस अडेअर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन्जामिन काल्टिझ, गारेथ डिलनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅकार्थी, मॅथ्यू हमफ्रेस, जय मुंदडा, मॅथ्यू होलार्ड.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा