Headlines

IND vs IRE ireland historic win prasidh krishna expensive spell; सर्वात महाग स्पेलनंतर ड्रॉप झालेला, तीन वर्षांनी कमबॅक, पण पुन्हा जोरदार धुलाई; प्रसिद्ध नकोशा विक्रमाचा मानकरी


Prasidh krishna expensive spell against ireland : प्रसिद्ध कृष्णा आयर्लंडविरुद्ध खेळताना भारताला खूपच महागात पडला आहे. त्याचे पुनरागमन असताना त्याच्या नावावर आता नकोसा विक्रम झाला आहे. या सामन्यात आयर्लंडने भारताला हरवले व कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय प्राप्त केला आहे.

prasidh krishna expensive spell
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या प्रसिद्धकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने अत्यंत महाग गोलंदाजी करत निराशा केली. चार षटकांत एकही विकेट न घेता त्याने तब्बल ५७ धावा खर्च केल्या आणि भारतीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. प्रसिद्धच्या महागड्या गोलंदाजीचा फटका भारतीय संघालाही बसला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १४८ धावांवर गारद झाला. त्यामुळे आयर्लंडने भारताचा ३४ धावांनी पराभव करत इतिहास रचला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धचा हा आयर्लंडचा पहिलाच विजय ठरला.

विशेष म्हणजे, सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत मिळून सर्वाधिक १२५ धावा देणारा प्रसिद्ध कृष्णा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यातही त्याने चार षटकांत ६८ धावा दिल्या होत्या. तो स्पेल आजही भारतीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महाग स्पेल मानला जातो.

प्रसिद्धच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका स्पेलमध्ये दोन वेळा ५५ पेक्षा जास्त धावा देणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज ठरला आहे.

Maharashtra TimesIND vs IRE : आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच

भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महागडे स्पेल

  • प्रसिद्ध कृष्णा – ६८ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (गुवाहाटी, २०२३)
  • युझवेंद्र चहल – ६४ धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (सेंच्युरियन, २०१८)
  • वरुण चक्रवर्ती – ६४ धावा, इंग्लंडविरुद्ध (मुंबई, २०२६)
  • अर्शदीप सिंग – ६२ धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (गुवाहाटी, २०२२)
  • जसप्रीत बुमराह – ५८ धावा, न्यूझीलंडविरुद्ध (तिरुवनंतपुरम, २०२६)
  • जोगिंदर शर्मा – ५७ धावा, इंग्लंडविरुद्ध (डर्बन, २००७)
  • प्रसिद्ध कृष्णा – ५७ धावा, आयर्लंडविरुद्ध (बेलफास्ट, २०२६)
  • दीपक चहर – ५६ धावा, वेस्ट इंडिजविरुद्ध (हैदराबाद, २०१९)
  • उमरान मलिक – ५६ धावा, इंग्लंडविरुद्ध (नॉटिंगहॅम, २०२२)

प्रसिद्ध कृष्णाच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिल्यास त्याने आतापर्यंत केवळ सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांत त्याने १४४ बॉल टाकताना तब्बल २७७ धावा दिल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट जवळपास १२ आहे. यामध्ये त्याला आठ विकेट्स मिळाल्या आहेत.

सुरुवात चांगली झालेली

त्याची सुरुवात मात्र चांगली झाली होती. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे २/३२ आणि २/२९ अशी कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विशाखापट्टणममध्ये १ विकेट, तिरुवनंतपुरममध्ये ३ विकेट्स मिळवल्या. मात्र गुवाहाटी येथे ६८ धावांचा महाग स्पेल त्याच्या कारकिर्दीवर डागासारखा ठरला आहे.

त्या मालिकेनंतर प्रसिद्ध बराच काळ भारतीय टी-२० संघाबाहेर होता. आता पुनरागमनाची संधी मिळाल्यानंतरही आयर्लंडविरुद्ध त्याला स्वतःला सिद्ध करता आले नाही. उलट आणखी एका महागड्या स्पेलमुळे त्याच्या टी-२० कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा