Headlines

Ice Cube Dryer Hack | वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे का टाकतात? व्हायरल लाँड्री हॅकचे सत्य जाणून घ्या


लोक सोशल मीडियावर एक “लाँड्री हॅक” जोरात शेअर करत आहेत वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकणे. व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की कपडे टाकून काही बर्फाचे तुकडे घातले की कपडे “इस्त्री न करता” मोकळे आणि सुरकुत्या नसलेले बाहेर येतात. हे पाहून अनेकांना वाटतं की बर्फाने डाग देखील निघतात, पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे.

Ice Cube Dryer Hack
फोटो सौजन्य :- @iStock
हा हॅक खरंतर “stain removal” साठी नाहीच. तो मुख्यतः “wrinkle reduction” म्हणजे कपड्यांच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरला जातो. ड्रायरमध्ये उष्णता आणि बर्फ यांचा मिलाफ झाला की बर्फ वितळून वाफ तयार होते. ही वाफ कपड्यांच्या फायबर्सना थोडं सैल करते आणि त्यामुळे कपडे कमी सुरकुतलेले दिसतात. पण हे फक्त हलक्या सुरकुत्यांसाठी उपयोगी ठरतं, खोल डाग किंवा घाण काढण्यासाठी नाही. सोशल मीडियावर व्हिडिओमुळे अशा अनेक “viral hacks” पसरतात. लोकांना ते सोपे आणि आकर्षक वाटतात, त्यामुळे ते पटकन शेअर होतात. पण समस्या अशी आहे की हे हॅक्स अर्धवट माहितीवर आधारित असतात. बर्फ टाकल्याने कपडे साफ होतात हा समज चुकीचा आहे. उलट जर कपड्यांवर डाग आधीच सेट झाले असतील, तर ड्रायरमधील उष्णता तो डाग आणखी पक्का करू शकते. (फोटो सौजन्य :- @iStock)

लोक हे का करतात?

लोक हे का करतात?

लोकांना “iron-free clothes” किंवा “instant wrinkle fix” हवा असतो. इस्त्री करण्याचा कंटाळा, वेळेचा अभाव आणि सोपी ट्रिक्स शोधण्याची सवय यामुळे असे व्हिडिओ व्हायरल होतात. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की लाँड्री सायन्स मध्ये तापमान, डिटर्जंट आणि फायबर ट्रीटमेंट यांचा योग्य वापर आवश्यक असतो. फक्त बर्फ टाकून कपडे साफ होत नाहीत. डाग काढण्यासाठी योग्य पद्धती वेगळी आहे. उदाहरणार्थ, तेलाचे डाग असतील तर डिशवॉशिंग लिक्विड थेट लावून धुणे उपयुक्त ठरतं. घामाचे किंवा पिवळसर डाग असतील तर व्हिनेगर किंवा ऑक्सिजन बेस्ड क्लीनर वापरला जातो. काही वेळा कपडे आधी भिजवून ठेवणे खूप प्रभावी ठरतं. त्यामुळे “ice cube hack” हा केवळ एक अर्धा सत्य असलेला इंटरनेट ट्रेंड आहे.

2

2

वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यावर काय होते

वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यावर काय होते

वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्याने कपडे अधिक स्वच्छ होतात किंवा त्यांची ‘डीप क्लिनिंग’ होते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. कपडे स्वच्छ होण्यामागे डिटर्जंट, पाण्याचे योग्य तापमान आणि वॉशिंग मशीनची धुण्याची प्रक्रिया हेच मुख्य घटक असतात. बर्फ हा कोणताही स्वच्छता करणारा पदार्थ नसल्यामुळे तो डाग किंवा घाण काढत नाही.

कोणत्या कपड्यांवर हा प्रयोग टाळावा?

कोणत्या कपड्यांवर हा प्रयोग टाळावा?

रेशीम , लोकरीचे, भरतकाम असलेले कपडे, सिक्विन किंवा नाजूक फॅब्रिक असलेले कपडे ड्रायरमध्ये टाकणेच अनेकदा योग्य नसते. अशा कपड्यांवर बर्फाचा प्रयोग केल्यास त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच ड्राय क्लीन करण्याच्या सूचना असलेल्या कपड्यांवर हा प्रयोग करू नये.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, बर्फाचा हा हॅक काही प्रमाणात सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकतो, मात्र तो इस्त्रीचा पर्याय नाही. तसेच हा उपाय डाग काढण्यासाठी किंवा कपडे अधिक स्वच्छ करण्यासाठी अजिबात उपयोगी नाही. कपड्यांवरील डागांचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य डिटर्जंट, स्टेन रिमूव्हर किंवा प्री-ट्रीटमेंट वापरणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

सोशल मीडियावरील प्रत्येक हॅकवर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावरील प्रत्येक हॅकवर विश्वास ठेवू नका

आजकाल सोशल मीडियावर दररोज नवीन घरगुती उपाय आणि लाँड्री हॅक्स व्हायरल होत असतात. काही ट्रिक्स खरोखर उपयुक्त असतात, तर अनेक व्हिडिओ केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी तयार केलेले असतात. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्यापूर्वी त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेणे आणि विश्वसनीय स्रोतांमधून माहिती तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा