Headlines

HSRP Number Plate Deadline Over Bike Car Owners Fine worth Rs 1 Lakh 50 Thousand in Nagpur; एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा, पहिल्याच दिवशी लाखोंचा दंड वसूल, लायसन्स नूतनीकरणासह इतर कामंही थांबणार


HSRP Number Plate न बसविणाऱ्या वाहन चालकांना मालकी हक्क हस्तांतरण, परवाना नूतनीकरण व वाहनांशी संबंधित व्यवहार करता येणार नाही, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.

HSRP Number Plate Maharashtra Times (4)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची (एचएसआरपी) मुदतवाढ संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने नागपूर शहरात कारवाईला सुरुवात केली. ३० जूनला एचएसआरपीची मुदत वाढ संपल्यानंतर आरटीओने बुधवारी शहरभर मोहीम राबवली. पहिल्याच दिवशी १५८ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आगामी काळात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार आहे.

दीड लाखांहून अधिक दंड वसूल

आरटीओच्या नागपूर शहर व पूर्व विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर व विजय चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकांनी संयुक्तपणे सकाळी कारवाईला सुरुवात केली. विविध पथकांनी ५०४ वाहनांची तपासणी केली. शहर विभागाने ५६ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत ५६ हजारांचा दंड वसूल केला. चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने १०२ वाहन चालकांना एक लाख दोन हजारांचा दंड आकारला.

नोंदणीचे पुरावे दाखवल्यास माफी

ज्यांनी एचएसआरपीची नोंदणी केली असेल त्या वाहनचालकांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. अशा वाहन चालकांना नोंदणीचा पुरावा दाखविणे आवश्यक आहे. ज्या वाहन चालकांनी नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
Maharashtra TimesSachin Ahir : उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, अहिरांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा

नागपुरातील आकडेवारी काय?

सध्या नागपूरच्या तीन आरटीओ विभागांतर्गत एकूण ६ लाख ९७ हजार वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आल्या आहेत. यात शहर विभागात २ लाख १० हजार ६६१, पूर्वमध्ये २ लाख २६ हजार ०४३ आणि ग्रामीणमध्ये दोन लाख ६० हजार ८२७ वाहनांचा समावेश आहे. या नंबरप्लेट न बसविणाऱ्या वाहन चालकांना मालकी हक्क हस्तांतरण, परवाना नूतनीकरण व वाहनांशी संबंधित व्यवहार करता येणार नाही, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.

Shrikant Shinde | मतदारसंघात जाऊन शिव्या देऊन राजकारण होत नसतं, ठाकरेंवर विखारी टीका

वाहतूक शाखाही आरटीओच्या मदतीने एचएसआरपी नसलेल्या वाहन चालकांविरुद्ध संयुक्तपणे कारवाई करणार आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी याबाबत वाहतूक झोनच्या सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निर्देश दिले आहेत.

पाच वेळा मुदतवाढ

राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप जवळपास निम्म्या वाहनांना नवीन नंबरप्लेटच लावल्या नाही. वर्षभरात पाचपेक्षा अधिकवेळा नंबरप्लेट बसविण्याची मुदत वाढविण्यात आली. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुदतवाढ दिल्याचा कुठलाच आदेश प्रादेशिक कार्यालयाकडे प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे बुधवारपासून कारवाया करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Maharashtra TimesAjinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव

महत्त्वाच्या कामांना खीळ

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओ कार्यालयातील कामेही होणार नाहीत. छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाने हा नियम आधीपासून लागू केला आहे. मात्र, हा निर्णय आता राज्यभरात लागू केला जाणार आहे. या निर्णयांतर्गत वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनाचे हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोझा चढविणे, कर्जबोझा उतरविणे यासह वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण ही कामे थांबविण्यात येणार आहेत. यात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम वगळण्यात आले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा