अलीकडेच असंच एक प्रकरण समोर आलं आहे जिथे एका व्यक्तीला फ्लॅट खरेदी केल्यानंतर 80000 रुपयांचे थकीत मेंटेनन्स शुल्क बिल मिळाले. यामुळे रीसेल फ्लॅट्सबाबत प्रश्न निर्माण होतो की, अपार्टमेंट असोसिएशन नवीन खरेदीदाराकडून आधीच्या मालकाची थकबाकी वसूल करू शकते का?
रीसेल फ्लॅट खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे
रीसेल फ्लॅट खरेदी केल्यानंतर केवळ नोंदणी करून ताबा घेणं पुरेसं नाही. अनेकदा नवीन खरेदीदारांना RWA किंवा अपार्टमेंट असोसिएशनकडून नोटीस मिळते, ज्यामध्ये त्यांना आधीच्या मालकाची थकबाकी भरण्यास सांगितले जाते. आधीच्या मालकाची थकबाकी नवीन खरेदीदाराकडून वसूल केली जाऊ शकते का? अशी परिस्थिती टाळण्यासाठी घर खरेदी करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी प्रत्येकाला माहिती असले पाहिजे.
नेमकं प्रकरण काय आहे?
केरळमधील कोची येथील एका व्यक्तीने 2022 मध्ये बँकेकडून लोन काढून रीसेल फ्लॅट खरेदी केला पण, फ्लॅटवर अंदाजे 80000 रुपयांचे मेंटेनन्स शुल्क थकीत असल्याचे खरेदीपूर्वी त्याला समजले. यानंतर त्याने आधीच्या मालकाकडे चौकशी केली, तेव्हा संपूर्ण रक्कम भरण्याचे आश्वासन दिले, ज्याच्यावर विश्वास ठेवून खरेदीदाराने फ्लॅटची नोंदणी केली.
Gold Silver Prices: सोनं 1700 रुपयांनी वाढलं, आठवडाभर चांदीचे दरही चढेच; सराफा बाजाराचा रिव्हर्स गियर, दर वाढणार की घसरणार, तज्ज्ञांचे मत काय?
पण फ्लॅटचा ताबा घेतल्यावर काही दिवसांतच अपार्टमेंट असोसिएशनने 80 हजारांचे देखभाल शुल्काची मागणी केली. असोसिएशनने सांगितले की, आधीच्या मालकाने कधीही भरले नव्हते आणि NOC शिवाय फ्लॅट विकलाच जाऊ नये. नवीन खरेदीदाराने थकीत रक्कम आधीच्या मालकाची असल्याचा दावा करत पैसे देण्यास नकार दिला. म्हणून आता प्रश्न उपस्थित होतो की, अपार्टमेंट असोसिएशन नवीन खरेदीदाराकडून थकीत रक्कम वसूल करू शकते का?
नव्या घर मालकाला जुनी थकबाकी भरावी लागणार का?
नवीन मालकाने खरेदीच्या वेळी आधीच्या मालकाचे मेंटेनन्स शुल्क भरणे बंधनकारक करणारा कोणताही देशव्यापी नियम नाही तर राज्याचे कायदे, सोसायटीचे नियम, विक्री करार आणि इतर नियमांवर अवलंबून असेल. त्यामुळे लक्षात घ्या की केवळ घर किंवा फ्लॅटची नोंदणी केली म्हणून सर्व जुने थकीत आपोआप माफ होतं असे गृहीत धरू नका.
8th Pay Commission: 18000 हजारांची बेसिक सॅलरी होणार 69000 रुपये? लवकरच होणार मोठा निर्णय; कधी येणार रिपोर्ट? जाणून घ्या टाइमलाइन
नोंदणीच्या तारखेपर्यंत सर्व देयके आधीचा मालक भरेल, असे सेल डीडमध्ये स्पष्ट नमूद केले असेल तर वाद निर्माण झाल्यास नवीन खरेदीदाराची बाजू अधिक मजबूत असू शकते. मात्र, अंतिम निर्णय संबंधित कायदा आणि प्रकरणाच्या गंभीरतेवर अवलंबून असेल.
रीसेल फ्लॅट खरेदी करताना घ्यायची काळजी
अशा परिस्थितीत, कोणताही रीसेल फ्लॅट किंवा घर खरेदी करताना सखोल चौकशी केल्यास वाद टाळता येतात.
1. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळवा – फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याच्या अपार्टमेंट असोसिएशन, RWA किंवा गृहनिर्माण संस्थेकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याची खात्री करा.
2. थकीत मेंटेनन्स शुल्काविषयी लेखी माहिती मिळवा – फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी देखभाल शुल्क, शिल्लक रक्कम, दंड आणि व्याज (असल्यास) याबद्दल लेखी माहिती मिळावा. केवळ तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहू नका.
3. विक्री करार काळजीपूर्वक वाचा – विक्री करारामध्ये थकीत मेंटेनन्स शुल्क कोण भरणार, खरेदीदाराची जबाबदारी कधी सुरू होते आणि वाद निर्माण झाल्यास संरक्षणे स्पष्ट नमूद केलेले असावे.
4. सोसायटीचे नियम तपासा – वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मेंटेनन्स शुल्काबाबत वेगवेगळे नियम असू शकतात, जे आधीच समजून घेतल्यास नंतर समस्या टाळता येतात.
5. मालमत्तेची कागदपत्रे तपासा – उर्वरित देखभाल शुल्कासोबतच, मालकी हक्काची कागदपत्रे, ताबा आणि पूर्तता प्रमाणपत्र, रेरा नोंदणी, मालमत्ता कर आणि वीज व पाण्याची बिले देखील तपासा.
