Headlines

Household Budget Affected By Inflation ; साखरेचे दर ४० तर कांद्याचे दर ६४ टक्क्यांनी वाढले, वर्षभरात एक-एक करून असं कोलमडलं तुमच्या किचनचं बजेट!


सध्या भारतातील सामान्य घरांमध्ये महागाईशी विशेष युद्ध सुरू आहे. साखरेच्या आणि कांद्याच्या वाढलेल्या किंमतीने सामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटाच्या गणितावर मोठा फरक पडत आहे. केंद्र सरकारच्या प्राइज मॉनिटरिंग डिव्हाईजच्या आकडेवारीनुसार, 27 ऑगस्ट 2025 ते 27 ऑगस्ट 2026 या काळात अनेक खाद्यपदार्थांच्या सरासरी रक्कमेत वाढ झाली आहे.

साखर आणि कांद्याच्या दरात मोठी वाढ

गेल्या महिन्याभरात साखरेच्या वाढत्या किंमती चर्चेचा महत्वाचा मुद्दा होता. केंद्र सरकारच्या प्राइज मोनिट्रिंग डिव्हिजनच्या आकडेवारीनुसार, 27 ऑगस्ट 2025 सरासरी किरकोळ बाजारात साखरेचा दर 46.40 रुपये होता. वर्षभरात म्हणजेच 27 ऑगस्ट 2026 रोजी साखरेच्या किंमतीत 17.93 रुपयांची वाढ झाली. साखरेची किंमत 64.33 रुपयांवर पोहचली. केंद्र सरकारच्या प्राइज मोनिट्रिंग डिव्हिजनच्या आकडेवारीनुसार,

देशात साखरेपाठोपाठ कांदाही महागला. वर्षभरापूर्वी 28.55 रुपयांनी विकला जाणाऱ्या कांद्याच्या किंमतीत सुमारे 63.15 टक्क्यांची वाढ झाली. ही वाढ वर्षभरातील सर्वाधिक वाढ आहे. कांद्याच्या किंमतीत 63.15 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 27 ऑगस्ट 2026 रोजी कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 46.58 रुपये होती.

साखरच नव्हे तर सारखरेचा पर्यायही महागला

केंद्र सरकारच्या प्राइज मोनिट्रिंग डिव्हिजनच्या आकडेवारीनुसार, 27 ऑगस्ट 2025 रोजी सरासरी किरकोळ बाजारात 56.94 रुपयांनी विकला जाणारा गूळ वर्षभरात 17.47 टक्क्यांनी महागला आहे. गुळाच्या किंमतीत 9.95 रुपयांची वाढ झाली असून किंमत 66.89 रुपयांवर पोहचली आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीही महागल्या

देशातील सामान्य नागरिकांच्या किराणा बजेटमध्ये खाद्यतेल एक महत्वाचा खर्च आहे. वर्षभरापूर्वी सरासरी किरकोळ बाजारात 161.80 रुपयांनी विकला जाणारा सूर्यफूल तेल वर्षभराने 191.23 रुपयाने विकला जात आहे. सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 18.19 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सोया तेल 146.52 रुपयांनी विकले जात होते. त्यात 12.97 टक्क्यांची वाढ होऊन किंमती 19.01 रुपयांनी महागल्या आहेत. 27 ऑगस्ट 2026 रोजी सोया तेलाची सरासरी किरकोळी किंमत 165.53 रुपये नोंदवण्यात आली होती.

डाळींच्या किंमतीतही बऱ्यापैकी वाढ दिसून आली

केंद्र सरकारच्या प्राइज मोनिट्रिंग डिव्हिजनच्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी 114.17 रुपयांनी मिळणारी उडीद डाळ वर्षभरात 6 ते 7 रुपयांनी महागली आहे. उडीद डाळीच्या किंमतीत 6.69 टक्क्यांची वाढ झाली असून किरकोळ बाजारातील सध्याची सरासरी किंमत 121.81 रुपये आहे.

तूरडाळही वर्षभरात 5.84 रुपयांनी महागली आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी 117.45 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या तूर डाळीची आताची सरासरी किरकोळ किंमत 123.29 रुपये नोंदवण्यात आली होती. इतर डाळींच्या किंमतीत क्वचित वाढ नोंदवण्यात आली आहे.

मग काही स्वस्त झालं की नाही?

यंदा बऱ्याच गोष्टी महागल्या आहेत पण सगळंच महागलं असं नाही. वर्षभरात टोमॅटोच्या किंमतीमध्ये बरीच घट दिसून आली आहे. टोमॅटोचे भाव 30.12 टक्के दराने घसरले आहेत. वर्षभरापूर्वी 50 रुपये पार असणारा टोमॅटो आता 38.26 रुपयांनी विकला जात आहे. बटाटे 10.06 टक्क्याने स्वस्त झाले आहेत. जिरेही 3.66 टक्क्याने स्वस्त झाले आहे.

Maharashtra TimesSubhash Chandra: कर्ज फेडू नका असा सल्ला मला मुकेश अंबानींनी दिलेला, सुभाष चंद्रा यांच्या आरोपांवर आता रिलायन्सचे उत्तरएकंदरीत, यंदा देशात साखर आणि कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या बातमीत पुरवण्यात आलेली माहिती देशभरातील सरासरी दरांचा अभ्यास असून देशात ठिकाणानुसार किरकोळ किंमतीत फरक आढळू शकतो.