Hirkani Kaksha: गोंदिया पंचायत समितीने हिरकणी कक्षाची मागणी केली नसतानाही तिथे हिरकणी कक्ष मंजूर केल्याचे अधिकारी सांगतात.
हिरकणी कक्ष(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
खेमेंद्र कटरे, गोंदिया: महिला व बालविकास विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात १८ हिरकणी कक्षांसाठी २.२८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. एका कक्षासाठी साधारणत: १२ लाख ६८ हजार रुपये किंमत ठरविण्यात आली. या कामाकरिता ई-निविदा प्रक्रिया न राबविता ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य खरेदी केली गेली. ही खरेदी करताना साधारणत: हजार रुपयांची प्लास्टिकची खुर्ची ३४ हजारांना तर पाच हजारांचे लोखंडी पलंग १.४४ लाख रुपयांना दाखविण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्ष उभारले जातात. हे कक्ष उभारण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. ही प्रक्रिया टाळून हिरकणी कक्षाच्या साहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार वॉश बेसिन ९० हजार रुपये, आरामदायक खुर्ची ३४ हजार, हाताने विणलेला पडदा १ लाख १२ हजार ८९९, बेड १ लाख ४४ हजार ४८६, ‘प्लेइंग किट फॉर चिल्ड्रन’ ४९ हजार २४६, कॅबिनेट रूम ६ लाख २५ हजार ६३२, एसी १ लाख, टीव्ही २२ हजार, रिसेप्शन खुर्ची ८९ हजार ७३७ रुपये अशी किंमत निर्धारित करण्यात आली होती.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा