Shreyas Iyer News : भारतीय संघाने आज झिम्बाब्वे संघाला ९० धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र विजयानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेचा ९० धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये पहिल्यांदाच श्रेयस अय्यर कॅप्टन झाल्यापासून टॉस हरला. भारताने पहिली बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या होत्या. भारताकडून ईशान किशन याने सर्वाधिक ८१ धावा केल्या. तिलक वर्मा यानेही नाबाद ६० धावा करत भारताल २०० धावांचा टप्पा पार करून दिला. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १७.५ ओव्हरमध्ये १२९ धावांवर ऑल आऊट केलं. भारताचा हा सलग दुसरा विजय असून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने विजय मिळवला खरा पण एक वाईट बातमी भारतासाठी आली आहे. नेमकी काय जाणून घ्या.
झिम्बाब्वेचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा ब्रायन बेनेट याने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण चढवले होते. त्याने १९ चेंडूत ३२ धाव करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले होते. त्यावेळी भारतीय गोलंदाजांवर काहीसा दबाव वाढला होता, मात्र यश ठाकूर याने बेनेटला आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर प्रिन्स यादव याने बेन कुरानला पहिल्याच चेंडूवर आऊट करत दुसरा धक्का दिला होता. त्या ओव्हरमध्ये १० धावा त्याने दिल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन सिकंदर रझा याला आऊट करत दुसरी विकेट नावावर केली पण त्याच्या उजव्या पायाच्या मांसपेशी ताणले गेल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. IND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार? दरम्यान, सामना संपल्यावर बोलतान कॅप्टन श्रेयस अय्यर याला तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यातील प्लेइंग ११ बाबत बोलताना त्यामध्ये काही बदल होतील असे सांगितले. दुर्दैवाने प्रिन्स यादव हा जखमी झाला आहे त्यामुळे काही बदल पाहायला मिळू शकतात, असे श्रेयस म्हणाला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा